ETV Bharat / city

नाशिकमध्ये ‘बंटी-बबली’ गजाआड; दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक घरफोड्यांची दिली कबुली - नाशिक बंटी बबली ताब्यात

शहर परिसरात घरफोडी करणाऱ्या जोशी दाम्पत्याला नाशिकरोड पाेलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून २ लाख २४ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Nashik
Nashik
author img

By

Published : Sep 13, 2021, 8:58 AM IST

नाशिक - जेलरोडच्या मंदिरातील दागिने चाेरून शहर परिसरात घरफोडी करणाऱ्या जोशी दाम्पत्याला नाशिकरोड पाेलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून प्रवासी रिक्षासह २ लाख २४ हजाराचा सोन्या-चांदीच्या ऐवज जप्त करण्यात आला आहे.

४८ रिक्षाचालकांची चौकशी -

चोरी, घरफाेडी करणारे बंटी-बबली रिक्षात फिरत असल्याची माहिती नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना कळाली हाेती. त्यांनी पाेलिसांना सांगून साध्या गणवेशात सापळा रचला हाेता. परंतु ते हाती आले नाही. मात्र, जाेशींची रिक्षा त्र्यंबकेश्वरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली हाेती. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने त्रंबकेश्वर गाठून विविध ठिकाणी जाऊन ४८ रिक्षाचालकांची चौकशी केली. त्यानंतर संशयित रिक्षाचालकाचे नाव मनोज जोशी व पत्नी लक्ष्मी जोशी असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तीन दिवस त्र्यंबकेश्वर शहरात संशयित जोशी यांचा शोध घेतला. दरम्यान, तो त्रंबकेश्वर टेलिफोन एक्सचेंज जवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या दोघांचाही फोटो पाेलिसांकडे आल्यावर पोलिसांनी दोघांनाही नाशकात रिक्षासह ताब्यात घेतले.

पती-पत्नी रिक्षामध्ये येऊन घरफोडी करत -

संशयितांनी नाशिक रोड परिसरातील काही घरांमध्ये व मंदिरांमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली असून दोघेही पती-पत्नी रिक्षामध्ये येऊन घरफोडी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दोघांकडून २ लाख ३४ हजार तीनशे रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला असून त्यात सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन, चांदीचा मुकुट व रिक्षाचा समावेश आहे.

हेही वाच - गणरायाच्या आरतीतही राजकारण? भाजप आमदाराला दिलेल्या वेळेपूर्वीच शिवसेना नेत्यांनी उरकली आरती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.