नाशिक - शहरातील वेगवेगळ्या भागांमधून चेन स्नॅचिंग करणाऱ्या अहमदनगरमधील एका सराईत गुन्हेगाराला नाशिक पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या गुन्हेगाराने 11 गुन्ह्यांची कबुली दिली असून पोलिसांनी त्याच्याकडून 154 ग्रॅम सोनेदेखील हस्तगत केले आहे.
श्रीरामपूरमधील अट्टल गुन्हेगाराला अटक
नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या सोनसाखळी चोरांना गजाआड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकलेला असतानाच 26 मार्चला नाशिक रोड भागातील चेहेडी पंपिंग स्टेशन परिसरातून पायी जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढणाऱ्या दोन जणांना परिसरातील नागरिकांनी शिताफीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. तर दोन जण फरार झाले होते तर या संशयितांचा शोध सुरू असतांना त्यातील सराईत गुन्हेगार नईम सय्यद आणि ट्रिपल एक्स उर्फ रॉकी हे दोघे पुण्यामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ लोणी याठिकाणी सैनिकी शाळेच्या मागे सापळा रचून नईमला अटक केली आहे.
संशयिताने दिली 11 गुन्ह्यांची कबुली
पोलिसांनी अटक केलेल्या नईम यांच्याकडून जवळपास 154 ग्रॅम सोन्याचे दागिने दुचाकी असा एकूण सात लाख 48 हजार 400 रुपयांचा ऐवज हस्तगत केला असून त्याने 11 गुन्ह्यांची कबुलीदेखील दिली आहे. दरम्यान, फरार असलेल्या संशयित रॉकीचा शोध पोलीस घेत असून त्याच्याकडूनही अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे..