ETV Bharat / city

पैशांचा पाऊस पडण्याचे आमिष दाखवत भोंदूबाबाचा महिलेवर अत्याचार - nashik crime news in marathi

नाशिक शहरात एका 27 वर्षीय पीडित महिलेची अंधश्रद्धेमुळे फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि पीडित महिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक पोलीस
नाशिक पोलीस
author img

By

Published : Aug 17, 2021, 7:40 PM IST

Updated : Aug 17, 2021, 7:46 PM IST

नाशिक - पैशांचा पाऊस पडण्याचे आमिष दाखवत एका भोंदूबाबने महिलेवर सातत्याने बलात्कार केल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक केली आहे.

अंगावरून नारळाचा उतारा

नाशिक शहरात एका 27 वर्षीय पीडित महिलेची अंधश्रद्धेमुळे फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि पीडित महिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून, डिसेंबर 2020मध्ये गंगापूर गाव पठाडे गल्ली येथे संशयित मुख्य आरोपी कामिल गुलाम शेख या भोंदूबाबाबाने पैशाचा पाऊस पाडण्याचे खोटे आमिष देऊन पीडित महिलेचे कपडे स्वतः हाताने काढून खोटी पूजा मांडून मंत्र पुटपुटत महिलेच्या अंगावरून नारळाचा उतारा केला. महिलेसोबत आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी एकवेळा असे 3 वेळा इच्छा नसताना शरीरसंबंध केला.

विविध कलमांतर्गत अटक

या प्रकरणात भोंदूबाबाला शिवराम फर्नांडिस, अशोक भुजबळ या दोघांनी मदत केली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी काही वेळतच भोंदूबाबासह दोघांना अटक केली आहे. या आरोपींवर 376, 354 अ, 34 महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालवण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 (3)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated : Aug 17, 2021, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.