नाशिक - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी असतानाच बॉम्बस्फोट झाला. याबाबत चौकशी करावी. हल्ला कोणी केला हे स्पष्ट करावे. गांधी परिवाराला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
हेही वाचा - पटोले व थोरातांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
रामाच्या नावाने टोल गोळा करण्याचे काम सुरू
'व्यर्थ न हो बलिदान', या कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आले असता नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला. बाबासाहेबांनी संविधान दिले नसते, तर तुम्ही चहा विकू शकले नसते. चहा विकता विकता तुम्हाला देश विकायची परवानगी दिली आहे का? असा प्रश्न उपस्थित करत रामाच्या नावाने टोल गोळा करण्याचे काम सुरू आहे. गावातील सप्ताहाचा हिशोब दिला नाही, तर गावातले लोक नेत्यांची बिन पाण्याने चंपी करतात, असा टोला लगावत पंतप्रधान योजनेत जे पैसे लाटले त्याचा हिशोब आधी द्या, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानी केली.
भाजपला कोण चालवते हे लोकांना कळत आहे
102 वी घटना दुरुस्तीसाठी मतदान केले जाते. यात भाजपचे पितळ उघड पडले आहे. भाजपने ओबीसी, मराठा दोन्ही समाजाला फसवले. फडणवीस यांनी राज्याची माफी मागावी. भाजपला आरक्षण संपवायचे आहे. ओबीसी व मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली तेव्हा भाजप पळून गेले, असा आरोप करत आमच्या हातात सत्ता आली तर आम्ही आरक्षण देऊ, असे नाना पटोले यांनी सांगितले. एक काळ असा होता की नागपूरहून भाजप चालायचे, आता भाजपला कोण चालवते हे लोकांना कळत आहे. कालपर्यंत जे लोकं मक्तेदारी गाजवायचे ते आज पायउतार झाले आहेत.
भाजपचे राजकारण आता संपत चालले आहे - पटोले
ओबीसी मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली तेव्हा भाजपवाले का पळून गेले, असा प्रश्न उपस्थित करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजामध्ये फूट पाडली, त्यांना फसवले यामुळे त्यांनी संपूर्ण राज्याबरोबर या दोन्ही समाजाची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केली. राज्यातील भाजपचे राजकारण आता संपत चालले आहे. आम्हाला नाव ठेवत होते, आता स्वतः काय करताहेत याचा विचार आत्मपरीक्षणाने भाजपने करावा. राज्यांमध्ये भाजप ही संपली आहे, असे सांगून पटोले म्हणाले की, विरोधी पक्षाचे अनेक आमदार खासदार आणि प्रमुख पदाधिकारी हे काँग्रेसच्या संपर्कात आहेत. योग्य वेळी त्यांचा काँग्रेस प्रवेश आम्ही करू.
पंतप्रधान इतर मंत्र्यांना पुढे करतात
देशावर संकट येते तेव्हा पंतप्रधान यांनी सामोरे जायला पाहिजे, बोलायला पाहिजे, परंतु आता परिस्थिती अशी आहे की, देशावर संकट आले तर पंतप्रधान इतर मंत्र्यांना पुढे करतात आणि स्वतः पाठीमागे राहतात. काहीही बोलण्यास तयार नाही, असा स्पष्ट आरोप करून पटोले यांनी सांगितले की, कोणत्याही पुरस्काराचे किंवा कोणत्याही योजनेचे नाव बदलून लोकांच्या मनामध्ये विश्वास संपादन करता येत नाही. विश्वास संपादन करण्यासाठी पावले उचलावी लागतात. परंतु, आज देशाचे पंतप्रधान याकडे लक्ष देत नाही. त्यांना त्यांची स्वतःची वाह वा करण्यात मोठेपण असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा - बीएचआर घोटाळ्याप्रकरणी सुनिल झंवर याला अटक