नाशिक - येवल्यात वादळी वाऱ्यासह पावसाने कांदा व्यापाऱ्यांचे कांदा शेड जमीनदोस्त झाले आहे. तर शेतकऱ्यांच्या कांदाचाळीवर झाड पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा देखील भिजला आहे.
कांदा व्यापाऱ्यांचे कांदा शेड जमीनदोस्त
येवला येथील कांदा व्यापारी रामेश्वर अट्टल व उमेश अट्टल यांचे आज झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने कांद्याचे तीन ठिकाणी असलेले शेड जमीनदोस्त झाले आहे. त्यामध्ये असलेला कांदा हा पूर्णपणे भिजला गेल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुसकान झाले आहे. तर अनेक व्यापाऱ्यांच्या शेडमधील हजारो क्विंटल कांदा देखील भिजला गेल आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान
वादळी पावसामुळे नगरसुल येथील वडाचा मळा परिसरातील शेतकरी सीताराम गोविंद पैठणकर व किरण विष्णू पैठणकर यांनी साठवलेल्या कांदा चाळीवर झाड पडल्यामुळे त्यांच्या कांदा चाळीचे आणि कांद्याचे 95 हजारांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने ग्रामीण भागात घरांचे पत्रे देखील उडाले आहे.
हेही वाचा - मुंबईत पेट्रोल फक्त ३५.६७ रुपये प्रतिलीटर, राज्य आणि केंद्राने कर काढला तर हे शक्य...