नाशिक - ऋषी पंचमीनिमित्त रामकुंडावर स्नान करण्यासाठी महिलांनी आज गुरुवार दि. 1 सप्टेंबर रोजी मोठी गर्दी केली होती. यामुळे पंचवटी रामतीर्थ परिसराला कुंभमेळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते.
गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग - या दिवशी सप्त ऋषींची पूजा करून गंगेत स्नान केल्यास जीवनात सुख, शांती, समृद्धी व धन प्राप्त होते अशी अशी धारणा आहे. काल रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली, त्यासोबतच गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने गोदावरी नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा - ३ MNS party workers arrest 3 मनसे कार्यकर्ते ताब्यात, मुंबादेवी परिसरात वृद्ध महिलेला मारहाण केल्याने कारवाई