नाशिक - महानगरपालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयाच्या इमारतीचा काही भाग कोसळला. संबंधित घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. नाशिक शहराच्या मेनरोड रोड परिसरातील पूर्व विभागीय कार्यलयाच्या या इमारतीचा बराचसा भाग धोकादायक झाला आहे.
संबंधित इमारत चुनखडीचा वापर करून दगडात बांधलेली आहे. महापालिकेच्या या इमारतीचे बांधकाम ब्रिटिशकालीन असल्याने ते जीर्ण झाले होते. इमारतीच्या दुरूस्तीबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने दगडी इमारतीत रोपे उगवून अंतर्गत बांधकाम कमकुवत झाले होते. मात्र, ही रोपे काढण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला नाही. अनेक वर्षांपासून या इमारतीच्या दुरवस्थेत वाढ होत आहे. भिंतीला मोठा तडा गेल्या कारणाने काही भाग आज (दि.२९ जुलै) रोजी दुपारच्या सुमारास कोसळला.
येथे पालिकेचे हे जुने मुख्यालय होते. त्यानंतर पूर्व विभागाचे कार्यालय अशी नवी ओळख या दगडी इमारतीला मिळालीया इमारतीला लागून विक्रेत्यांची काही दुकाने आहेत. योग्य काळजी न घेतल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.