ETV Bharat / city

Nashik Hospital Fire Audit : फायर ऑडिट न केलेल्या 318 रुग्णालयांना नाशिक मनपाची नोटीस

नाशिक शहरातील 607 रुग्णालयांपैकी 318 हॉस्पिटलने फायर ऑडिट ( Nashik Hospital Fire Audit ) केलं नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रूग्णांच्या जीवाशी खेळणारे हॉस्पिटल आता महानगरपालिकेच्या रडारवर आले असून अशा हॉस्पिटलला अग्निशामक विभागाने ( NMC Notice To Hospitals ) नोटीस बजावली आहे.

Nashik Hospital Fire Audit
Nashik Hospital Fire Audit
author img

By

Published : Mar 31, 2022, 8:23 PM IST

नाशिक - नाशिक शहरातील 607 रुग्णालयांपैकी 318 हॉस्पिटलने फायर ऑडिट ( Nashik Hospital Fire Audit ) केलं नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रूग्णांच्या जीवाशी खेळणारे हॉस्पिटल आता महानगरपालिकेच्या रडारवर आले असून अशा हॉस्पिटलला अग्निशामक विभागाने ( NMC Notice To Hospitals ) नोटीस बजावत पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.

प्रमाणपत्र प्राप्त करणे अनिवार्य - महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम नुसार शासकीय कार्यालय, हॉटेल, बियर बार अँड रेस्टॉरंट, रुग्णालय, बहुमजली शैक्षणिक इमारती, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यावसायिक इमारती, मंगल कार्यालय औद्योगिक इमारती, गोदामे, सिनेमागृह, पंधरा मीटरपेक्षा अधिक उंच रहिवाशी इमारतींना अग्निप्रतिबंधक यंत्रणा लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या यंत्रणा सुस्थितीत आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी वर्षातून दोनदा म्हणजे जानेवारी व जुलै महिन्यात फायर ऑडिटचे ब प्रमाणपत्र मुख्य अग्निशमन अधिकार्‍याकडून प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे.

ऑडीटसाठी चालढकल - अग्निशामक विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने पालिकेला प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करता येत नाही, याचाच फायदा घेत फायर ऑडिट करण्यास चालढकल केली जाते. या दरम्यान काही दिवसांपूर्वी नगर येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने फायर ऑडिटसाठी महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित रुग्णालयांना 10 फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेट दिल्यानंतर 607 रुग्णालय पैकी जनतेने 289 रुग्णालयाने फायर ऑडिट केले आहे, तर 318 रुग्णालयांनी फायर ऑडिट केलेचं नसल्याने अशा रुग्णालयांना नोटीस बजावून वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, महानगरपालिका दरवर्षी प्रमाणे नोटीस देऊन सोपस्कार पार पडणार की कारवाई पण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा - AICC President Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी तीन महिन्यात होणार निवडणूक.. काँग्रेस नेते कमलनाथ यांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.