ETV Bharat / city

Student Cross River In Nashik : शाळेसाठी विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास; अंगावर काटा आणणारा हा Video पाहाच

पूल नसल्याने अनेक वाड्यापाड्यांचा संपर्क तुटला आहे. पाण्यामुळे मुलांना शाळेत जाता येत नाही. असाच नाशिकमधील एक व्हिडिओ समोर आला ( Student Cross River In Nashik ) आहे.

Student Cross River In Nashik
Student Cross River In Nashik
author img

By

Published : Aug 4, 2022, 7:10 PM IST

नाशिक - मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नद्या, नाल्यांना पूर आला आहे. याचा फटका तेथील नागरिकांना बसत आहे. तसेच, पूल नसल्याने अनेक वाड्यापाड्यांचा संपर्क तुटला आहे. पाण्यामुळे मुलांना शाळेत जाता येत नाही. शाळा अघोषित बंद झाली आहे. दुसरीकडे ग्रामस्थांनाही याच जिवघेण्या पाण्यातून जात कसरत करावी लागत आहे.

  • #WATCH |Maharashtra: In absence of a bridge, group of children in Peth taluka, Nashik cross river every day to reach school

    "River is deep but children have to go to school, so we carry them either on shoulders or in big utensils. We request admn to build a bridge," says a local pic.twitter.com/rNmdPKD3lx

    — ANI (@ANI) August 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

असाच एक व्हिडिओ एएनआयने ट्विट केला आहे. नाशिकमधील पेठ तालुक्यातील हा व्हिडिओ आहे. येथील देवाळाचा पाड्यात पक्का रस्ता, पूल नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी नदीनाल्याला पूर आल्याने पुलाअभावी नदी पार करावी लागत आहे. यासाठी पाड्यातील ग्रामस्थ एका मोठ्या भांड्याच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना बसवून जीव मुठीत घेत नदी पार करताना दिसत ( Student Cross River In Nashik ) आहेत.

याबाबत येथील ग्रामस्थांनी आपली आपबीती सांगताना म्हटलं की, नदी खोल आहे. मात्र, मुलांना शाळेत जावे लागते, म्हणून आम्ही त्यांना खांद्यावर किंवा मोठ्या भांड्यात घेऊन जातो. आम्ही प्रशासनाला पूर बांधण्याची विनंती केल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. दरम्यान, विद्यार्थी जात असताना अचानक पाणी वाढले तर, त्यांच्यासाठी आणि ग्रामस्थांनाही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे येथील नदीवर पूल बांधणे गरजेचे आहे.

हेही वाचा - नालंदामध्ये मृत्यूचा Live Video : उलटलेल्या मालगाडीत चढून सेल्फी घेणारा जळून खाक...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.