ETV Bharat / city

National Award For Children : नाशिकचा जलतरणपटू स्वयम पाटीलचा राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव

author img

By

Published : Jan 25, 2022, 3:44 PM IST

जलतरणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नाशिकच्या स्वयम पाटील ( Swimmer Swayam Patil ) याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ( PM Narendra Modi ) हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने ( National Award For Children 2022 ) गौरविण्यात आले. ऑनलाईन पद्धतीने हा सोहळा पार पडला. देशातील 29 मुलांना प्रातिनिधीक स्वरुपात दूरदृषयप्रणालीद्वारे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

स्वयंम पाटील
स्वयंम पाटील

नाशिक : जिल्ह्यातील स्वयम पाटील ( Swimmer Swayam Patil ) या 14 वर्ष गटातील (मतिमंद) बालकाने एलिफंट गुफा ते गेटवे ऑफ इंडिया हे 14 किलोमीटर खाडी अंतर 4 तास 9 मिनिटात पोहून पार करत विक्रम रचला. याची दखल घेत केंद्र सरकारने त्यास क्रीडा क्षेत्रातील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन सन्मानित ( National Award For Children 2022 ) केले. कानपूर आयआयटीमार्फत ब्लॉकचेन माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या हस्ते भ्रमणद्वानीवर डिजिटल प्रमाणपत्र व एक लाख रुपये रोख रक्कम पाटील त्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आली.

नाशिकचा जलतरणपटू स्वयम पाटीलचा राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव

स्वयम च्या नावे अनेक पुरस्कार

स्वयंम पाटील यास यापूर्वी देखील लिमका बुक ऑफ रेकॉर्ड 2017, दिव्यांगजन सशक्तिकरण हेतू राष्ट्रीय पुरस्कार 2018, वंडर बुक ऑफ इंटरनॅशनल रेकॉर्ड 2018, जिल्हा क्रीडा पुरस्कार 2020 तसेच वर्ल्डस् रेकॉर्ड इंडिया अशा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

आता ऑलम्पिकची तयारी

शारीरिक व मानसिक समस्याग्रस्त असलेल्या मुलांना प्रशिक्षण देताना फार अडचणी येतात. स्वयम बाबतीत तसे झाले. स्पर्धेचे नियम सांगताना त्यात भाग घेतल्यानंतर इतर विशेष मुलांप्रमाणे फार अडचणी आल्या नाहीत. तो सात वर्षांचा असताना त्याने संकरॉक लाईट हाऊस ते गेट वे ऑफ इंडिया हे पाच किलोमीटरचे अंतर सर्वसाधारण मुलांप्रमाणे एक तासात पार करत वर्ल्ड रेकॉर्ड केला. तेरा वर्षाचा असताना एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे चौदा किलोमीटरचे अंतर सात तासात पूर्ण केलं. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आता त्याची ऑलम्पिकसाठी तयारी सुरू आहे, अशी माहिती प्रशिक्षक हरी सोनकांबळे यांनी दिली.

त्याच्या कष्टाचे चीज झाले

स्वयमला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आनंद झाला. असं वाटलं नव्हतं की इतक्या मोठ्या पुरस्कार मिळेल. स्वयंम लहानपणापासूनच शारीरिक आणि मानसिक समस्याग्रस्त होता. त्याचे प्रशिक्षक कांबळे सरांनी त्याच्यावर खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी घेतलेल्या कष्टाचे आज चीज झाले. तो स्विमिंगसोबत योगा, डान्स, मार्शल आर्ट, मॉडलिंग करतो असं स्वयंमची आई विद्या पाटील यांनी सांगितलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.