नाशिक - जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी वैशाली झनकर लाचलूचपत विरोधी पथकाच्या जाळ्यात सापडल्या आहेत. एका संस्थाचालकांकडून लाच घेताना ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वैशाली झनकर यांच्या चालकाला अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्हापरिषदमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती नुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी एका शिक्षण संस्था चालकांकडून शाळेसाठी अनुदान मंजूर करावे यासाठी म्हणून लाच मागितली होती. या लाचेची रक्कम जिल्हा परिषदेतील आपला वाहन चालक यांना देण्यास सांगितली होती. त्यानंतर झनकर यांना देण्यासाठी आणेलेली लाचेची रक्कम घेतांना मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वाहनचालकाला रंगेहात ताब्यात घेतले.
वाहन चालकाकडे चौकशी केली असता, आपण ही लाच शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी सांगितल्याने स्वीकारत असल्याचे सांगितले. तसेच ही बाब शिक्षणाधिकारी यांच्या समोर कबूल केली आहे. या धडक कारवाईमुळे जिल्हा परिषदेमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे. विशेष म्हणजे नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत कोणतीही माहिती नव्हती. जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांना लाच घेताना अटक केल्यामुळे या कारवाईची जोरदार चर्चा रंगली आहे. वैशाली झनकर यांच्या कारभाराविषयी याआधी अनेक तक्रारी होत्या, यापूर्वीचे शिक्षणाधिकारी बच्छाव यांना निलंबित केल्यानंतर झनकर यांच्याकडे हा पदभार आलेला होता.
नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर एसीबीच्या जाळ्यात - लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर
या लाचेची रक्कम जिल्हा परिषदेतील आपला वाहन चालक यांना देण्यास सांगितली होती. त्यानंतर झनकर यांना देण्यासाठी आणलेली लाचेची रक्कम घेताना मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वाहनचालकाला रंगेहाथ ताब्यात घेतले.