ETV Bharat / city

खाकी वर्दीचा कौटुंबिक जिव्हाळा; हुतात्मा कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबीयांना अधीक्षकांकडून दिवाळी भेट - कोरोनामुळे पोलिसांचा मृत्यू

sp कर्तव्याव्यावेळी काही पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा कोरोनाने ग्रासले गेले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरातील कर्ता गेल्याने या पोलिसांची कुटुंबे पोरकी झाली होती, अशा कुटुंबीयांना पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी मायेचा आधार दिला आहे.

हुतात्मा कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबीयांना अधीक्षकांकडून दिवाळी भेट

author img

By

Published : Nov 14, 2020, 8:16 PM IST

नाशिक - कोरोना महामारीमध्ये कर्तव्य बजावत असताना नाशिक ग्रामीण पोलीस दलातील काही कोरोना योद्ध्यांना वीरमरण आले. या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना पोलीस अधीक्षक सचिन पाटील घरी जाऊन जुन्या चालीरितीप्रमाणे दिवाळीची भेट दिली. या उपक्रमातून नाशिक पोलीस दलाने कौटुंबिक जबाबदारी पार पाडत दिवाळीत मायेची भेट देऊन त्या कुटुंबांना आधार दिला. पोलीस अधीक्षक सचिन पाटील व अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी हा उपक्रम राबविला.

पोलीस कुटुंबाच्या सुख दुःखात सहभागी-

कोरोना संकट काळात कोरोना योद्धा असलेल्या पोलिसांनी जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावले आहे. या कर्तव्याव्यावेळी काही पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा कोरोनाने ग्रासले गेले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरातील कर्ता गेल्याने या पोलिसांची कुटुंबे पोरकी झाली होती, अशा कुटुंबीयांना पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी मायेचा आधार देत कौटुंबिक जबाबदारी पार पाडली.

नाशिक पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचा हा उपक्रम अनुकरणीय व अभिमानास्पद आहे. वीरमरण आलेल्या पोलीस कुटुंबाच्या सुख दुःखात आपण नेहमी त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांना कोणत्याही संकटात आधार देणार असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.