नाशिक - इलेक्ट्रिक वाहनात बेकायदेशीररित्या बद्दल करणाऱ्या वाहनचालकांवर नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत बारा इलेक्ट्रिक वाहनांवर कारवाई करत, सात इलेक्ट्रिक वाहने जप्त केली आहेत. ( Electric Bike New Guideline )
इलेक्ट्रिक वाहनात बेकायदेशीररित्या बदल करणाऱ्या वाहनचालकांवर नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांत अशी 12 वाहने आढळली असून, त्यापैकी 7 वाहनांवर आतापर्यंत जप्तीची कारवाई करण्यात आली ( nashik rto seizes 7 Electric Bike ) आहे. संबंधित वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून,वाहनात अनधिकृतपणे बदल करण्याच्या गुन्ह्यात एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे.
काय आहे नियम - इलेक्ट्रिक बाइक्सची ताशी वेगमर्यादा 25 किलोमीटरपेक्षा अधिक करण्यासाठी बॅटरीची क्षमता 250 व्हॅट हून अधिक वाढवून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. ई-बाइक्समध्ये अशा प्रकारे केलेले बदल यामुळे वाहने जळून खाक होण्यासारख्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे असे बदल करणाऱ्या व करवून घेणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करा. असे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात आरटीओची पथके ई-बाइक्समध्ये बदल करणाऱ्यांवर कारवाईसाठी सज्ज झाले आहेत.
7 वाहने जप्त - गेल्या दोन दिवसांत शहरासह जिल्ह्यात ई-बाइक्सची तपासणी सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये १२ वाहनांत अनधिकृतरित्या बदल करून घेतल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत त्यापैकी सात वाहनांची जप्ती करण्यात आली. ई बाइकमध्ये अनधिकृतपणे बदल केल्यास एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत यांनी दिली. यापुढेही अशा कारवाया सुरूच राहणार असल्याचे भगत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - Goat Farming Success Story : सावित्रीची गरुड झेप; महिलांची शेळी पालन संस्थेतून एक करोडची उलाढाल
हेही वाचा - Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी; 20 जूनला मतदान