नाशिक - पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या गुलाब चक्रीवादळाने नाशिकसह राज्यात पावसाचे धुमशान सुरू आहे. गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसाने १५ हजार क्यूसेकने विसर्ग सुरू असून गोदावरीला पूर आला आहे. यंदाच्या हंगामातील हा तिसरा पूर ठरला आहे..
व्यावसायिकांनी दुकाने हलवली -
गोदावरी नदीपात्रात १५ हजार क्यूसेकने विसर्ग सुरू असून धरणातून सोडलेले पाणी दुपारपर्यंत गोदाकाठापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. पुराचे मापन असलेला दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी लागले आहे.
हे ही वाचा -VIDEO : गोदावरी नदीच्या पुरात युवकांची जीवघेणी स्टंटबाजी
जिल्ह्यातील या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू -
नाशिक जिल्ह्यातील एकूण 24 मोठी आणि मध्यम धरण प्रकल्प आहेत. यातील बहुतांश धरणे 90 टक्केहून अधिक भरली आहेत. या धरणांपैकी गंगापूर, काश्यपी, आळंदी, वाघड, पुणेगाव, दारणा, भावली, करंजगाव, नाग्यासक्या, चनकापूर, हरणबारी, नादुरमध्यमेश्वर, केळझर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी अधिक प्रमाणात सुरू आहे.