नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी, पोलीस यंत्रणा रात्रंदिवस राबत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर न पडण्यासाठी प्रशासनामार्फत विनंती करण्यात येत आहे. मात्र काही महाभागांना याचे गांभीर्य नसल्याचे चित्र शहरात आहे. काही ना काही कामाचे निमित्त करत मास्क न वापरता फिरणाऱ्या रिकामटेकड्यांची पोलिसांनी चांगलीच शाळा घेतलीय.
जुने नाशिक भागात अशा रिकामटेकड्यांना पकडून भररस्त्यात उठाबशा काढायला लावल्या आहेत. तर काहींना योगासने करण्याचे सांगत त्यांना समज दिलीय. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सुजाण नागरिकांमधून कौतुक होत आहे.