ETV Bharat / city

मुथूट फायनान्स दरोडा प्रकरणात गोळीबार करणाऱ्या कुख्यात आरोपीला बिहारमधून अटक

author img

By

Published : Jul 26, 2019, 9:13 PM IST

आकाश सिंग याने मुथूट फायनान्सच्या अधिकाऱ्यावर गोळीबार केला. यानंतर तो फरार झाला होता. नाशिक पोलिसांनी त्याला बिहारच्या आरा जिल्ह्यातून अटक केली आहे. तो कुख्यात गुन्हेगार सुबोध सिंग आणि मनीष सिंग यांच्यासाठी काम करत असल्याचे समोर आले आहे. सुबोध सिंग आणि मनीष सिंग याला पोलीस अटक करण्याच्या तयारीत आहेत.

मुथुट फायनान्स दरोड्यातील आरोपी

नाशिक- शहरातील मुथूट फायनान्समध्ये १४ जानेवारीला सहा दरोडेखोरांनी गावठी पिस्टलचा वापर करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मुथूट फायनान्स मधील अधिकारी सॅमी सॅम्युअल यांचा गोळीबारात मृत्यू झाला होता. या प्रकरणातील प्रमुख आरोपी आकाशसिंग राजपूत याला नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने बिहारमधील आरा जिल्ह्यातून मोठ्या शिताफीने अटक केली, अशी माहिती नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास-नांगरे पाटील यांनी दिली.

मुथुट फायनान्स दरोड्यातील आरोपीला अटक केल्याची माहिती देताना पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील

नाशिक येथून पोलीस पथक बिहारमधील पाटणा येथे आकाशसिंगच्या मागावर गेले होते. तेथे त्यांनी दानपूर, राजूनगर पोलीस ठाण्यात जाऊन, अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांना गोपनीय बातमीदारांमार्फत बिहार राज्यातील भोजपूर जिल्ह्यामध्ये आकाशसिंग राजपूत नावाची व्यक्ती वेश बदलून त्याच्या गावातील मित्राकडे राहत असल्याची माहिती मिळाली. मात्र, त्या ठिकाणाहून देखील आकाशसिंग फरार झाला. पोलिसांना तेथील स्थानिक भाषेची अडचण येत असल्यामुळे त्यांनी एक दिवस फक्त भाषेचा अभ्यास केला. यानंतर तेथील गावांमध्ये बिहारी लोकांचा वेश परिधान करून सदर गावांमध्ये आकाशचा शोध घेतला.

विष्णू नगर भागात एका मैदानात आकाशसिंगची स्विफ्ट कार पोलिसांना सापडली. पोलिसांनी सात दिवस गाडी जवळ बिहारी वेशात सापळा रचला. मात्र, आकाशसिंग त्या ठिकाणी फिरकला नाही. त्यानंतर 23 जुलै रोजी पोलिसांना चांदी या गावामध्ये आरोपी आकाशसिंगचा शोध घेतला असताना, तो विष्णुनगर येथे गाडी घेण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. आकाशसिंगच्या गाडीपासून पोलीस 30 मीटर लांब थांबले होते. यानंतर गाडी घेण्यासाठी आलेली व्यक्ती आकाशसिंग असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. तब्बल 16 दिवसानंतर आकाशसिंगला पकडण्यात पोलिसांना यश आले.

आकाशसिंग हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणी सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. आकाश हा बिहार येथील अतिशय कुख्यात गुन्हेगार सुबोध सिंग यांच्यासाठी काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुथूट फायनान्सवर दरोडा टाकण्याचा प्लॅन सुबोध सिंग आणि मनीष सिंग यांनी केला असून त्यांना अटक करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक ढमाळा, पोलीस उपनिरीक्षक सोनवणे, पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Intro:मुथूट फायनान्स दरोडा प्रकरणात गोळीबार करणारा कुख्यात आरोपी बिहार मधून गजाआड...

Body:14 जानेवारी नाशिकच्या मुथूट फायनान्स मध्ये सहा दरोडेखोरांनी गावठी पिस्टलचा वापर करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता, त्याच मुथूट फायनान्स मधील अधिकारी सॅमी सैम्युअल यांचा गोळीबारात मृत्यू झाला होता, यातील प्रमुख दुसरा आरोपी आकाशसिंग राजपूत याला नाशिकच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बिहारमधील आरा जिल्ह्यातून मोठ्या शिताफीने अटक केली..

आकाशसिंगच्या मार्गावर नाशिक येथून पोलीस पथक बिहार राज्यातील पटना येथे गेले होते,तेथे त्यांनी दानपुर,राजूनगर, पोलीस ठाण्यात जाणून जाऊन,अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या आरोपींनची माहिती घेतली,त्यानंतर गोपनीय बातमीदारांमार्फत बिहार राज्यातील भोजपुर जिल्ह्यांमध्ये आकाश सिंग राजपूत नावाचा इसम पेहराव बदलून त्याच्या गावातील मित्राकडे राहत असल्याची माहिती मिळाली,मात्र त्या ठिकाणाहून देखील आकाश फरार झाला,पोलिसांना तेथील स्थानिक भाषेची अडचण येत असल्यामुळे एक दिवस फक्त भाषेचा अभ्यास त्यांनी केला,
तसेच गावांमध्ये बिहारी लोकांचा वेश परिधान करून सदर गावांमध्ये अहोरात्र आकाशचा शोध घेतला,

विष्णू नगर भागात एका मैदानात आकाश ची स्विफ्ट कार पोलिसांना मिळून आली,पोलिसांनी सात दिवस गाडी जवळ बिहारी वेशात सापळा रचला मात्र आकाश त्या ठिकाणी फिरकला नाही..त्यानंतर 23 जुलै रोजी पोलीस आणि चांदी या गावांमध्ये आरोपी आकाशाचा शोध घेतला असतांना, पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की आकाश सिंग विष्णुनगर या ठिकाणी गाडी घेण्यात येत असल्याची माहिती मिळाली, पोलीस पथक आकाश सिंग येत असल्याच्या ठिकाणापासून 30 मीटर लांब होते,आकाश सिंग असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आकाशला अटक केली...तब्बल 16 दिवसानंतर आकाश पकडण्यात पोलिसांनां यश आलं...

आकाश बहादुरसिंग हा कुख्यात गुन्हेगार असून,त्याच्यावर उत्तर प्रदेश,बिहार या ठिकाणी त्याच्यावर सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे, तसेच आकाश हा बिहार येथील अतिशय कुख्यात गुन्हेगार सुबोध सिंग यांच्यासाठी काम करत असल्याचे समोर आले आहे ,मुथूट फायनान्स वर दरोडा टाकण्याचा प्लॅन सुबोध सिंग आणि मनीष सिंग यांनी केला असून त्यांना अटक करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे..
ह्या कारवाईत सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील ,पोलिस निरीक्षक ढमाळा, पोलीस उपनिरीक्षक सोनवणे पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्यासह पथकाने ही कारवाई केली..

बाईट
विश्वास नांगरे पाटील पोलीस आयुक्त नाशिक..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.