नाशिक - पेन पकडू की, छत्री धरू अशी परिस्थिती नाशिक महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांवर आली आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शाळेचे छत गळत ( roof of school leaking )असून विद्यार्थ्यांना छत्री घेऊन अभ्यास करावा लागत आहे.
विद्यार्थी डिजिटल शिक्षण देण्याचा संकल्प - नाशिक महानगरपालिकेने विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्याचा संकल्प केला होता. मात्र, आता महानगरपालिकेला शाळेतील गळती कधी थांबणार असा प्रश्न विद्यार्थ्यी, पालक विचारात आहेत. शहरातील महानगरपालिकेच्या वडाळा गाव, भद्रकाली, बजरंग वाडी परिसरातील महानगरपालिकेच्या शाळांची बिकट अवस्था ( Bad situation of Nashik Municipal Corporation school ) आहे. नाशिकमध्ये गेल्या पाच दिवसांपासून पावसाची संततधार ( Constant Rain In Nashik ) सुरू आहे. अशात या ठिकाणच्या शाळांच्या छतामधून गळती सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात देखील छत्री घेऊन अभ्यास करण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही तर ओली जमीन, ओल्या भिंती आणि धोकादायक वीज उपकरणे यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात ( students are suffering )आला आहे. दरवर्षी महानगरपालिका देखभाल दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा पैसा ठेकेदाराला देत असते. असे असतांना देखील पालिकेच्या शाळांची दुरवस्था झाली आहे.
शाळांची दुरवस्था - महानगरपालिकेच्या शाळांच्या खोलीत पावसामुळे पाणीच पाणी साचत आहे. त्यामुळे मुलांना बसण्यासाठी जागा नसल्याचेही चित्र आहे. इमारतीची दुरुस्ती न झाल्यामुळे पडण्याची भीती शिक्षकांसह पालकांनी व्यक्त केली आहे. महानगरपालिकेच्या अनेक शाळेमध्ये खोल्यांची ही दुरावस्था झाली आहे. यासोबतच संरक्षण भिंत, स्वच्छतागृह अशा अनेक प्रकारच्या समस्या इथं विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत.
दुरुस्तीसाठी पत्र दिले - महानगरपालिकेच्या शाळांमधील छतांच्या गळती संदर्भात शाळांकडून पत्र आल्यानंतर लगेच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. मोठ्या कामांसाठी निविदा काढण्यात येणार असून लवकरच हे काम पूर्ण होईल असे शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी सांगितले.
शाळेची आकडेवारी - नाशिक महानगरपालिकेच्या एकूण 126 शाळा आहेत. त्यापैकी 86 शाळा या इमारतीमध्ये भरतात, यात मराठी माध्यमाच्या 109, हिंदी माध्यमाच्या 4 आणि उर्दू माध्यमाच्या 13 शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये 29 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर 940 शिक्षक हे अध्यापनाचे काम करत आहेत.
हेही वाचा - Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा 'रुद्रावतार', ड्रोनने टिपली खास दृश्ये