नाशिक - पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने गोदावरीसह अन्य उपनद्यांच्या तीरावर विसर्जनासाठी 27 नैसर्गिक स्थळांची यादी जाहीर केली आहे. या व्यतिरिक्त 43 ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. या सर्व विसर्जन स्थळावर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने व मूर्ती व निर्माल्य संकलन केले जाणार आहे, ऑनलाईन टाईम बुक करून विसर्जन स्थळी येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.
कृत्रिम तलावाची निर्मिती -
दरवर्षीप्रमाणे महानगरपालिकेने गणेश विसर्जनाकरीता कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. तसेच पीओपी मूर्तीचे घरच्या घरी विसर्जन व विघटन होण्यासाठी पालिकेच्या विभागीय कार्यालयामार्फत अमोनिअम कार्बोनेट पावडरचे वाटप करण्यात आले आहे. नाशिक महानगरपालिकाने गणेश विसर्जनासाठी पारंपारिक 27 ठिकाणांबरोबरच जलप्रदूषण टाळण्यासाठी 43 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. 50 किंवा त्यापेक्षा अधिक फ्लॅट असणाऱ्या सोसायटीकरिता मागणीनुसार फिरता विसर्जन टँक देण्यात येणार असल्याचे नाशिक पालिकाचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.
कुठे कुठे नैसर्गिक विसर्जन स्थळ -
- सातपूर - गंगापूर धबधबा, सोमेश्वर, चणशी, मते नर्सरी नाशिक पूर्व-लक्ष्मीनारायण मठ, रामदास स्वामी मठ, मनपा एसटी परिसर, आगर टाकळी, नंदिनी गोदावरी संगम
- नाशिक रोड - चेहेडी गाव नदी किनार, पंचक गोदावरी नदी, स्वामी जनार्दन पुल, दसक गाव नदी किनारी, वालदेवी नदी किनारी, देवळाली गाव, वालदेवी विहितगाव नदी किनारी
- पंचवटी - म्हसरुळ, सीता सरोवर, राजमाता मंगल कार्यालय, नांदूर मानून, आडगाव पाझरतलाव, रामकुंड परिसर, तपोवन, गौरी पटांगण, म्हसोबा भंडारण टाळकुटेश्वर
- नाशिक पश्चिम - यशवंत महाराज पटांगण, हनुमान घाट,घारपुरे घाट, सिद्धेश्वर मंदिर, रोकडोबा पटांगण
- नवीन नाशिक - वालदेवी घाट, पिंपळगाव खांब
हेही वाचा - नाशिक : सातपूर एमआयडीसीतील एका कंपनीत अचानक स्फोट, 6 कामगार जखमी