ETV Bharat / city

नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू - nashik city news

आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज (गुरुवार) डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाचा दौरा केला. तसेच, यावेळी माध्यमांसोबत बोलताना आयुक्त गमे यांनी, नाशिककरांनी कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असता असल्यास त्वरित उपचार घ्यावे, असे आवाहन केले आहे.

nashik-municipal-corporation-employee-dies-due-to-corona
नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू
author img

By

Published : Aug 6, 2020, 8:09 PM IST

नाशिक - महानगरपालिकेतील विद्युत विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज (गुरुवार) डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाचा दौरा केला. तसेच, यावेळी माध्यमांसोबत बोलताना आयुक्त गमे यांनी, नाशिककरांनी कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असता असल्यास त्वरित उपचार घ्यावे, असे आवाहन केले आहे.

नाशिक शहरातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक शहरातील द्वारका परिसरात असलेल्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाचा गुरुवारी पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधितांना व्यवस्थित उपचार मिळत आहेत की नाही, रुग्णांना कुठल्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, आरोग्य विभाग व्यवस्थितपणे आपले काम पार पाडत आहे की नाही, तसेच त्यांना कुठल्या समस्यांचा सामना करावा लागतोय, या गोष्टींचा आढावा घेतला.

नाशिक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा - रुग्णवाहिकेच्या कमतरतेमुळे आजही होत आहेत रुग्णांचे हाल, रुग्णांची लूट सुरूच

नाशिक महानगरपालिकेच्या विद्युत पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या एका मनपा कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर तातडीने आयुक्तांनी हा दौरा केला. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासल्यास ऑक्सिजनच्या टाक्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर नेत असताना कर्मचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, आता ऑक्सिजनच्या टाक्या खालीच बसवण्यात आल्याने कामाचा होणारा अतिरिक्त ताण कमी झाला आहे. त्यामुळे वेळेची देखील बचत झाली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

दरम्यान कोरोनामुळे मृत झालेल्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना उपचार घेण्यास विलंब झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवत असल्यास तातडीने उपचार घेण्याचे आवाहन आयुक्तांनी नाशिककरांना केले आहे. काही दिवसांपूर्वीच स्मार्ट सिटी प्रोजेक्ट मधील एका कर्मचार्‍याचा कोरोनाने बळी गेला होता. त्यात नाशिक शहरातील बाधितांच्या संख्येमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

हेही वाचा - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कोरोना 'पॉझिटिव्ह'

त्यामुळे, नाशिककरांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. या पाहणी दौऱ्यात मनपा आयुक्तांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. तसेच त्यांच्याही समस्या जाणून घेतल्या. यावेळी आरोग्य विभागाचे डॉ. रमेश पवार, डॉक्टर नितीन रावते, झाकीर हुसेन रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.