ETV Bharat / city

Nashik Budget : नाशिक महापालिकेचा २२१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर; कोणतीही करवाढ नाही! - नाशिक महापालिकेचा २२१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प

नाशिक महानगरपालिकेचे अंदाजपत्रक आज आयुक्त कैलास जाधव यांनी ( Nashik corporation commissioner Kailash Jadhav ) सादर केले आहे. हे सहाव्या पंचवार्षिकमधील अखेरच्या वर्षाचे ( Last budget in five years plan ) अंदाजपत्रक आहे. महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ( Nashik Budget in Standing committee ) हे अंदाजपत्रक ठेवले.

नाशिक महापालिकेचा अर्थसंकल्प
नाशिक महापालिकेचा अर्थसंकल्प
author img

By

Published : Feb 8, 2022, 3:02 PM IST

Updated : Feb 8, 2022, 3:17 PM IST

नाशिक - नाशिक महापालिकेचा अर्थसंकल्प ( Nashik Budget present by Administration ) आज सादर झाला आहे. २२१९ कोटी प्रशासकीय अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केला आहे. कोणतीही करवाढ नसलेला २२१९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी ( No tax proposals in Nashik Budget ) आज स्थायी समितीत सादर केले.

नाशिक महानगरपालिकेचे अंदाजपत्रक आज आयुक्त कैलास जाधव यांनी ( Nashik corporation commissioner Kailash Jadhav ) सादर केले आहे. हे सहाव्या पंचवार्षिकमधील अखेरच्या वर्षाचे ( Last budget in five years plan ) अंदाजपत्रक आहे. महापालिकेचे आयुक्त जाधव यांनी स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हे अंदाजपत्रक ठेवले. यासाठी सभापती गणेश गीते यांच्याकडे आयुक्त कैलास जाधव यांनी अंदाजपत्रक दिले आहे.

नाशिक महापालिकेचा २२१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

हेही वाचा-घोटीच्या सेंद्रिय हळदी प्रकल्पाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट.

  1. नाशिकच्या बिटको रुग्णालयात मेडिकल कॉलेज उभारणी करता ६५ कोटी रुपयांची तरतूद
  2. सार्वजनिक बांधकाम करता सर्वाधिक ३७८ कोटी रुपयांची तरतूद
  3. पर्यावरण आणि गोदावरी संवर्धन करता गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने निधी यंदाच्या वर्षी २८ कोटी ८८ लाखाचा निधी
  4. भावी नगरसेवकांसाठी एकूण ८५.९८ कोटी , गेल्या वर्षी हाच निधी २३७ कोटी इतका होता.
  5. नाशिककरांवर घरपट्टी पाणीपट्टी अतिरिक्त बोजा नाही , तर कोणतीही करवाढ नाही
  6. नगरसेवक निधीतून कोणतीही वाढ नाही ३० लाख वार्षिक निधी कायम
  7. नाशिक शहरबस सेवेसाठी ९० कोटीची तरतूद
  8. नाशिकशहरातील उद्यान विकासासह सहाही विभागात १० हजार वृक्ष लागवडीसाठी २१ कोटीची तरतूद
  9. शहरात उभारल्या जाणाऱ्या आयटी पार्कसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद
  10. महापालिका निवडणूक खर्चासाठी १५ कोटी रुपयांचा निधी
  11. ई - स्मार्ट स्कूल योजना प्रकल्पासाठी अंदाजपत्रकात १५ कोटी रुपयांसह एकूण शिक्षणासाठी २६ कोटीची तरतूद, शहरातील ६ विभागात स्मार्ट स्कूल उभारणार
  12. शिक्षणाच्या योजना करता ड्रोन सर्वेक्षण मॅपिंग करणार
  13. बांधकाम व्यवसायिकांना इलेक्ट्रिक वाहनचार्जिंग स्टेशन बंधनकारक करणार
  14. महापालिका पर्यावरण पूरक भांडे खरेदी करणार
  15. शहराच्या मुंबईनाका परिसरात महात्मा फुले सावित्रीबाई फुले संयुक्तिक पुतळ्यासह, पश्चिम विभागात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बिडी भालेकर येथे अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा, पंचवटीत महाराणा प्रताप पुतळा उभारणारण्याचा प्रस्ताव

हेही वाचा-Complaint File Against Police : गैरवर्तन करणाऱ्या कर्नाटक पोलिसांना महाराष्ट्राच्या रणरागिणीचा हिसका

अंदाजपत्रकाला मान्यता मिळाल्यानंतर सभेत होणार सादर-

मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षासाठी रु. ५३.५२ कोटी आरंभीच्या शिल्लकेसह, रु. २२२७.०५ कोटी जमेचे व रु. २२१९.०२ कोटी खर्चाचे मूळ अंदाजपत्रक सादर केले आहे. तसेच सन २०२२-२०२३ च्या मूळ अंदाज पत्रकानुसार, अखेरची शिल्लक रक्कम रु. ८.०३ कोटी दर्शविण्यात आलेली आहे. सन २०२१-२०२२ सुधारीत व सन २०२२-२३ चे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले. अंदाजपत्रकास मान्यता मिळाल्यानंतर आयुक्त अंदाजपत्रकीय सभेत हे बजेट स्थायी समिती सभापती गणेश गीते हे सादर करतील करतील.

अर्थसंकल्पाचे सदस्यांकडून स्वागत

आगामी महापलिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवता स्थायीकडून शहरवासीयांसाठी विविध आकर्षक घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. स्थायी समितीचे सभापती गणेश गिते ( Nashik standing committee chairman Ganesh Gite ) यांनी आयुक्त कैलास जाधव यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की पुढील आठवड्यात स्थायी समिती सर्व सदस्यांशी चर्चा करून अर्थसंकल्प महासभेसमोर सादर करणार आहेत. समितीचे इतर सदस्य राहुल दिवे मुकेश शहाणे यांनी व इतर सदस्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

हेही वाचा-Burn sugarcane in Nashik : गोदाकाठी 20 एकर ऊस जळून खाक ; निफाड तालुक्यातील शिंगवे शिवारातील घटना

Last Updated : Feb 8, 2022, 3:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.