नाशिक - राज्यात सत्तांतर होताच अधिकार्यांच्या बदल्यांचा खेळ सुरु झाला असून नाशिक महापालिकेचे आयुक्त डाॅ. रमेश पवार ( Commissioner of Nashik Municipal Corporation Dr Ramesh Pawar ) यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार नवे ( Dr Chandrakant Pulkundwar New Commissioner ) महापालिका आयुक्त असणार आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जातात.
कार्यकाळ पूर्ण नसतांना रमेश पवारांची उचलबांगडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे अनेक निर्णय बदलण्याचा सपाटा लावला असून आता ठाकरे यांच्या मर्जीतील अधिकार्यांच्या बदल्या करत आणखी मोठा धक्का दिला आहे. ठाकरेंच्या मर्जीतील नाशिक मनपा आयुक्त रमेश पवारांची उचलबांगडी केली आहे. कार्यकाळ पूर्ण नसतांना रमेश पवारांची उचलबांगडी करत ठाकरेंना दणका दिला आहे. म्हाडा सदनिका घोटाळा प्रकरणानंतर कैलास जाधव यांना आयुक्तपद सोडावे लागले. मागील २४ मार्चला रमेश पवार यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. आयुक्त व प्रशासक अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत त्यांनी कामाचा झपाटा लावला होता. त्यामुळे अवघ्या पाच महिन्यात त्यांची बदली चर्चेचा विषय ठरत आहे. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार महापालिकेचे नवे मनपा आयुक्त असणार आहेत. पुलकुंडवार हे एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील अधिकारी आहेत. या आधी पुलकुंडवार हे एमएसआरडीसी या खात्याचे अधिकारी होते.
हेही वाचा - Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंचं बंड, उद्धव ठाकरे रणांगणांत; शिवसेनेच्या बांधणीसाठी 20 दिवसांत 13 बैठका