नाशिक - निफाड परिसरातून १७ डिसेंबर २०२० रोजी एका कमकुवत व बंबल फूट आजाराने ग्रस्त असलेल्या युरेशियन ग्रिफॉन गिधाडाला रेस्क्यू करण्यात ( Nifad Eurasian Vulture Rescue )आले होते. त्या गिधाडावर आता यशस्वी उपचार ( Nifad Vulture Treatment ) करत बर्ड रिंग लावून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
17 डिसेंबर रोजी इको फाउंडेशन व वन विभागाच्या टीमने या गिधाडाला आयसोलेट करुन नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलवले होते. या गिधाडावर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे डॉ. विभू प्रकाश माथुर (भारतातील गिधाड प्रजनन केंद्राचे प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले. उपचारानंतर गिधाडाला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याची कार्यवाही सुरु झाली. त्यासाठी नाशिकमध्ये गिधाड सुरक्षित क्षेत्र स्थापन करण्यावर वनविभागासोबत कार्यरत असलेली नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी, नाशिक यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून पिवळया रंगाच्या डार्विक रिंग मिळवण्यात आली.
त्यानंतर 14 जानेवारी रोजी डॉ. विभू यांच्याकडून ऑनलाईन प्रशिक्षण घेवुन नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीच्या सहकार्याने गिधाडाच्या उजव्या पायावर लेग रिंग लावण्यात आली. ३० दिवसांच्या उपचार आणि काळजीनंतर आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करुन टॅग करण्यात आलेल्या गिधाडाचे अंजनेरी, वनक्षेत्र नाशिक (प्रादेशिक) पुनर्वसन करण्यात आले.
यांनी केली कार्यवाही
नाशिक वन विभागाच्या पूर्व भागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक, मनमाड डॉ. सुजित नेवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी, येवला (प्रा.) अक्षय म्हेत्रे, वनपरिक्षेत्र अधिकारी, फिरतेपथक (वणी) बशीर शेख, वनपरिमंडळ अधिकारी, (अंजनेरी) एच. डी. सावकार, मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले, इको-इको फाउंडेशनचे अभिजित महाले, नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी, नाशिकच्या प्रतिक्षा कोठुळे यांचे सहकार्याने कार्यवाही करण्यात आली.
हेही वाचा - Nagar Panchayat Election 2022 : 'आर्थिक बळावर जागा जिंकल्या...'; दीपक केसरकरांचा भाजपावर घणाघात