ETV Bharat / city

लसीकरणानतंरही विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे कोरोना पॉझिटिव्ह! - विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे न्यूज

कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून यात प्रशासकीय अधिकार्‍यांनाही लस देण्यात येत आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही दोनच दिवसांपूर्वी १७ फेब्रुवारी रोजी लस घेतली. मात्र दोनच दिवसांत त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

राधाकृष्ण गमे
राधाकृष्ण गमे
author img

By

Published : Feb 20, 2021, 8:46 AM IST

नाशिक - कोरोनाची लस टोचून घेतल्यानंतरही नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. सरकारमधील मंत्रीही आता कोरोना बाधित होऊ लागले आहे. खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, शिक्षणराज्यमंत्री बच्चू कडू, अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री एकनाथ शिंदे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून यात प्रशासकीय अधिकार्‍यांनाही लस देण्यात येत आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही दोनच दिवसांपूर्वी १७ फेब्रुवारी रोजी लस घेतली. मात्र दोनच दिवसांत त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लसीकरणानंतर अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने लसीच्या परिणामकारकतेबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

हेही वाचा - VIDEO : टीम इंडियाच्या 'स्पायडरमॅन'चा नवा अंदाज पाहिला का?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.