नाशिक जिल्ह्यातील Nashik district काही भागात मध्यरात्री अतिवृष्टी झाली. यात, नाशिक जवळील वंजारवाडी येथे, मध्यरात्री घर कोसळून छबु सिताराम गवारी आणि त्यांची पत्नी मंदाबाई गवारी या दोघांचा मृत्यू झाला. तर पावसाने नाशिक शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या पथदीपाचा विद्युत प्रवाह पाण्यात गेलाने, बबलू खान या युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसाने तीन नागरीकांचा Three civilians killed due to heavy rain बळी घेतला.
शहरातील वाहतूक विस्कळीत नाशिकात रात्री मुसळधार पाऊस झाला असून, या पावसाने नाशिक जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. पावसाचे प्रमाण इतके होते की, अवघ्या दीड तासातच नाशिक शहरातील रस्ते जलमय झाले होते. अनेक ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत Traffic disrupted in many places झाली होती. अशात वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडल्याने रस्ते बंद झाले होते. यावेळी घराबाहेर असलेल्या नागरिकांचे मोठे हाल झाले.
पाण्याचा विसर्ग सुरू नाशिक मध्ये रात्रीच्या सुमारास गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने, गंगापूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत Increase in water level of Gangapur Dam वाढ झाली. धरणातून 2500 क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीत करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदी पुन्हा एकदा दुधडी भरून वाहत आहे. अशात गोदावरी नदी परिसरातील अनेक लहान मोठे मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
नाशिक जिल्ह्यात यापुर्वी गेल्या जुलै महीन्यात देखील असाच मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे जवळपास चार ते पाच दिवस अनेक गावांचा व रस्त्यांचा संपर्क तुटला होता.