ETV Bharat / city

कोरोना इफेक्ट : 31 मार्चपर्यंत नाशकातील नोटा छपाई बंद...! - इंडिया सिक्युरिटी प्रेस

कोरानाचा वाढता प्रादुर्भाव ध्यानी घेऊन 31 मार्चपर्यंत नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस या दोन्ही कंपन्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Currency Note Press closed till 31 march
31 मार्चपर्यंत करन्सी नोट प्रेस राहणार बंद
author img

By

Published : Mar 23, 2020, 10:33 AM IST

Updated : Mar 23, 2020, 11:32 AM IST

नाशिक - कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत राज्य सरकारने 31 मार्चपर्यत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यात 144 कायद्याअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून 31 मार्चपर्यंत नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस या दोन्ही कंपन्या बंद ठेवण्यात येणार आहेत.

दोन्ही कंपन्यात मिळून 4 ते 5 हजार कर्मचारी काम करत असून याठिकाणी मोठ्या प्रमाणत चलन, पासपोर्ट आणि स्टॅम्प छापले जातात. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य सरकारने 31 मार्चपर्यत अत्यावश्यक सेवा वगळता सगळी दुकाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याच अनुषंगाने नाशिक रोड येथील करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसमधील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने 31 मार्चपर्यंत या दोन्ही कंपन्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनेशी चर्चा झाली आहे. आम्ही वार्षिक टार्गेट पूर्ण केले असून 20 मार्चपर्यंतचे 99 टक्के काम पूर्ण झाले असून या निर्णयामुळे देशात कुठलेच आर्थिक संकट येणार नाही, असे करन्सी नोट प्रेस मजदूर संघाचे अध्यक्ष जगदीश गोडसे यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा -

COVID-19: दादरमध्ये 'गो कोरोनाचा गो'च्या नाऱ्यासह घंटानाद...

कोरोना संकट; राज्यात रुग्णांची सख्या 89 वर...

Last Updated : Mar 23, 2020, 11:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.