नाशिक - शहरात गेल्या दहा दिवसांपासून रोज 1400 ते 1500 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून ( Nashik Corona Update ) येत असून कोरोनाच्या तिसर्या लाटेत सक्रिय रुग्णांची ( Active Cases in Nashik ) संख्या दहा हजारांच्यावर गेली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण 7 टक्के हून 4 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. सद्यस्थितीत 390 रुग्ण महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहे.
राज्यासह नाशिकमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने उसळी घेतली आहे. मात्र, रुग्ण बाधित होण्याचे प्रमाणत अधिक असले तरी तीव्र लक्षणे नसल्याने चिंतेचे कारण नाही. दिलासादायक बाब म्हणजे 96 टक्के रूग्णांना सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच अलगिकरणात राहून उपचार घेत आहे. सद्यस्थितीत नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 10 हजार 815 कोरोना बाधित रुग्ण असून केवळ 390 रुग्ण शहरातील महानगरपालिका रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यापैकी 106 रूग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे.
20 रुग्ण व्हेंटिलेटरवर वर - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण हे अवघे 4 टक्के असून खासगी आणि सरकारी रुग्णालयात 390 रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी 106 रुग्ण ऑक्सिजनवर ( Oxygen Beds ) असून 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर ( Ventilator Beds ) आहेत. आयसीयूत 80 रुग्ण दाखल आहेत. तर 184 रुग्ण सामान्य बेडवर उपचार घेत आहेत. सुमारे 10 हजार 152 रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याने कोरोना झाला तरी लक्षण सौम्य असल्याचे दिसून येत आहे.
नाशिक शहरातील लसीकरण परिस्थिती - नाशिक शहरात आतापर्यंत लसीची पहिली मात्रा 13 लाख 35 हजार 381 जणांनी म्हणजे जवळपास 97.92 टक्के लोकांनी घेतली आहे तर दुसरी मात्रा 9 लाख 56 हजार 452 इतके म्हणजे 70.14 टक्के इतक्या जणांनी घेतली ( Vaccination ) आहे. आतापर्यंत 7 हजार 518 जणांनी बूस्टर डोस ( Booster Dose ) घेतला आहे.