ETV Bharat / city

Nashik Bus Accident : बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले; मदतीसाठी धावलेल्यांनी सांगितला थरारक अनुभव - Nashik Bus Accident Fire

नाशिक येथे खासगी ट्रॅव्हल बसला आज पहाटे लागलेल्या आगीत ( Nashik Bus Accident Fire) आतापर्यंत 12 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 34 जण जखमी (Nashik Bus Accident death and injured) झाले आहेत. पहाटेची शांतता आगीत जळालेल्या प्रवाशांच्या किंकाळ्यांनी भंग पावली. जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्यांच्या मदतीसाठी आसपासच्या लोकांनी धाव घेतली. काहींना वाचविण्यात त्यांना यशही आले; मात्र 12 जणांना या अपघातात प्राण गमवावे लागले. हा सर्व घटनाक्रम पाहणाऱ्यांनी त्यांच्या भावना (Nashik bus accident rescuers Experiences) ईटीव्ही प्रतिनिधी कपिल भास्कर यांच्यासोबत व्यक्त केल्या.

Nashik Bus Accident
Nashik Bus Accident
author img

By

Published : Oct 8, 2022, 2:14 PM IST

नाशिक : येथे खासगी ट्रॅव्हल बसला आज पहाटे लागलेल्या आगीत ( Nashik Bus Accident Fire) आतापर्यंत 12 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 34 जण जखमी (Nashik Bus Accident death and injured) झाले आहेत. पहाटेची शांतता आगीत जळालेल्या प्रवाशांच्या किंकाळ्यांनी भंग पावली. जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्यांच्या मदतीसाठी आसपासच्या लोकांनी धाव घेतली. काहींना वाचविण्यात त्यांना यशही आले; मात्र 12 जणांना या अपघातात प्राण गमवावे लागले. हा सर्व घटनाक्रम पाहणाऱ्यांनी त्यांच्या भावना (Nashik bus accident rescuers Experiences) ईटीव्ही प्रतिनिधी कपिल भास्कर यांच्यासोबत व्यक्त केल्या.

आगीत सापडलेल्या प्रवाशांना वाचविण्याचा अनुभव सांगताना नागरिक

अखेर लोखंडी रॉडने बसच्या काचा फोडल्या- पहाटे 5:30 वाजता जेव्हा जोरात आवाज झाला तेव्हा आम्ही घरातून पळत बाहेर आलो. तेव्हा बसच्या बाजूला आग लागली होती. बस मधील महिला, लहान मूल वाचवा म्हणून ओरडत होते. मी आणि माझ्या मुलाने आणि बाजूच्या नागरिकांनी तात्काळ लोखंडी रॉड आणून बसच्या काचा फोडल्या ( rescuers broke bus windows) आणि लहान मूल महिलांना बाहेर काढलं (pulled out passengers from burning bus); पण काही वेळातच बसने पेट घेतला. या आगीची दाहकता एवढी होती की, आम्ही तिच्या जवळ थांबू शकलो नाही. अशात बसमधील उरलेले प्रवासी किंचाळत होते. जळत होते मात्र आम्ही काहीच करू शकलो नाही. असं स्थानिक नागरिकांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. या अपघातात त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.