ETV Bharat / city

Nashik Bus Accident: नाशिक बस अपघातातील आरोपी चालकाला अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नाशिक अपघातात आडगाव पोलिसांनी काल मध्यरात्री संशयित चालक रामजी जगबिर यादव (वय 27 राहणार तारागाव तालुका, हांडीया उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. (Nashik accident driver arrested). त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा तसेच मोटर वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Nashik Bus Accident
Nashik Bus Accident
author img

By

Published : Oct 9, 2022, 9:49 AM IST

नाशिक: आडगाव पोलिसांनी काल मध्यरात्री नाशिक बस अपघातातील संशयित चालक रामजी जगबिर यादव (वय 27 राहणार तारागाव तालुका, हांडीया उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. (truck driver arrested). त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 304 अ 279, 336, 337, 338, 427 नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच मोटर वाहन कायदा कलम 184, 134 अ ब अंतर्गत देखील गुन्हा दाखल केला आहे. काल नाशिकच्या औरंगाबाद रोडवर खाजगी प्रवासी बस आणि ट्रकचा अपघात झाला होता. (Nashik Bus Accident). या घटनेत बसला आग लागून त्यात बारा जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर 36 प्रवासी जखमी झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल केला होता.

कसा झाला होता अपघात? : 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास यवतमाळच्या चिंतामणी ट्रॅव्हल्स कंपनीची (chintamani travels) खाजगी बस मुंबईच्या दिशेने निघाली होती. 8 सप्टेंबरला पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौफुलीवर तिला सिन्नर कडे जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत बसची ट्रकच्या डिझेल टाकीला आग लागून काही वेळातच बस आगीच्या भक्षस्थानी पडली. यात बसमधील 48 प्रवाशांपैकी 12 प्रवाशांचा जागीच जळून मृत्यू झाला, तर 36 जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढत जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

अपघाताची होणार चौकशी: अपघाताच्या वेळी बस मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी या अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे. भुजबळ म्हणाले, खाजगी बस चालवणारे अनेक नियम पाळत नाहीत. अवैधरित्या प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांचे परवाने रद्द केले पाहिजेत. या अपघाताची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी आगीत होरपळलेल्यांची रुग्णायात जाऊन भेट घेतली आणि घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

पंतप्रधानांकडून मदत जाहीर: पंतप्रधानांकडून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना उपचारासाठी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली गेली आहे. तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांनी मृताच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा (Rs 5 lakh help in Nashik Bus Accident) केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.