नाशिक - महाराष्ट्र्रातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत लसीकरणात नाशिक ( Covid vaccination in Nashik ) जिल्हा मागे पडल्याने जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. 90 टक्के लोकांचा कोरोना प्रतिबंधक पहिला डोस आणि 70 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतलेल्या 14 जिल्ह्यांमधील कोरोनामुळे लावण्यात आलेले निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र, नाशिक जिल्ह्यात पहिला डोस 80 टक्के तर दुसरा डोस 60 टक्के लोकांनी घेतला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
राज्य सरकारने जिथे 90 टक्के पेक्षा अधीक लसीकरण झाले आहेत. त्या ठिकाणचे कोरोना निर्बंध हटवले आहेत. मात्र, नाशिक जिल्ह्यात पहिला डोस 86.22 टक्के तर दुसरा डोस 60 टक्के लोकांनी घेतला आहे. सरासरीने जिल्ह्यात पहिला डोस 3.78 टक्के तर दुसरा डोस 7.65 टक्क्यांनी कमी आहे. नाशिक जिल्ह्यातील लसीकरणाची पात्र असलेल्या 18 वर्षावरील 51 लाख 75 हजार 800 नागरिकांपैकी 86.22 टक्के लोकांनी पहिला डोस घेत आहे. तर 62.35 टक्क्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत. तर 15 वर्षेवरील 84.43 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असून 60.23 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 15 ते 17 वर्ष दरम्यानच्या व्यक्तींचे पाहिल्यास अवघ्या 57.33 टक्के बालकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर अवघ्या 28.21 टक्के बालकांनी दुसरा घेतला आहे.
ए-श्रेणीत हे शहर आहेत -
राज्यातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, भंडारा ,नागपूर, वर्धा, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, चंद्रपूर, गोंदिया, कोल्हापूर या 14 जिल्ह्यांना ए श्रेणीत टाकले आहे. या श्रेणीतील जिल्ह्यातील 90 टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तर 70 टक्के लोकांना दुसरा डोस मिळालेला आहे. तसेच या जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रेट 10 टक्के आहे.
नागरिकांनी लसीकरण करावे -
नागरिकांच्या विशेष मदतीमुळेच आपण कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झालो आहे. आता हळुवारपणे निर्बंध हटविले जात आहे. पण लसीकरणाची अट ठेवली असून, अट पूर्ण होण्यास अवघे 3.78 टक्के लोकांचे लसीकरण होणे बाकी आहे. नागरिकांनी पुढे येऊन लस घ्यावी. जेणेकरून जिल्हा कोरोना मुक्त होईल, असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी म्हटलं.
हेही वाचा - Bhandara-Nilaj Highway : 'तुम्ही चुकीच्या माणसाला काळे झेंडे दाखवले'; गडकरींनी दिले स्पष्टीकरण