ETV Bharat / city

नाशिकच्या अंबड परिसरातील संभाजी स्टेडियममध्ये युवकाचा खून - nashik crime news

नवीन नाशिक परिसरातील संभाजी स्टेडियमजवळ एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे

नाशकात युवकाचा खून
नाशकात युवकाचा खून
author img

By

Published : Feb 12, 2021, 8:03 PM IST

नाशिक - नवीन नाशिक परिसरातील संभाजी स्टेडियमजवळ एका तरुणाचा खून केल्याची घटना आज दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. योगेश तांदळे असे खून करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, महिलांची छेड काढल्यामुळे हा खून करण्यात आल्याचे समजत आहे.

नाशकात युवकाचा खून

धारदार शस्त्राने वार करत केली हत्या-

योगेशने परिसरातून जात असलेल्या काही मुलींची छेड काढल्यामुळे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रागाच्या भरात धारदार शस्त्राने वार करत ही हत्या केली, असे समजते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुत्र हाती घेतली. पुढील तपास अबड पोलीस करीत आहेत.

भरदिवसा नाशिकच्या वर्दळीच्या भागात युवकाची हत्या-

हत्या करण्यात आलेला युवक हा नाशिकच्या मोरवाडी भागातील रहिवासी असल्याचं प्रथम दर्शनी मिळालेल्या माहितीत समोर आले आहे. मात्र भरदिवसा नाशिकच्या वर्दळीच्या भागात युवकाचे अशा प्रकारे हत्त्या करण्यात आलेला संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा- गोपीचंद पडळकरांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची चौफेर टिका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.