ETV Bharat / city

Satana Murder case : घरी आल्याने खून; सटाण्यातील खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश

author img

By

Published : Apr 8, 2022, 3:42 PM IST

Updated : Apr 8, 2022, 4:21 PM IST

३ एप्रिल रोजी सटाणा येथील कंधाणे फाटा, मोरेनगर शिवारातील हॉटेल गुरूकृपाचे पाठीमागे मोकळ्या जागेत घमजी रंगनाथ माळी(४५, सध्या रा. मोरेनगर शिवार, मुळ रा. पिंगळवाडे, ता. सटाणा) यांचा मृतदेह सापडला ( Satana Murder case ) हाेता. सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार ( PI Subhash Anmulwar ) व स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळाची पाहणी करून घमजी माळी यांच्या दैनंदिन कामकाज व राहण्याची माहिती घेतली.

खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश
खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश

नाशिक - घरी गेला, या क्षुल्लक कारणातून एकाने दुसऱ्याच्या डाेक्यात दगड घालून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. सटाणा पाेलिसांनी या खुनाचा चार दिवसांत उलगडा केला आहे. मुख्य संशयिताला अटक करण्यात आल्याची माहिती पाेलीस अधिक्षक सचिन पाटील ( Nashik SP Sachin Patil ) यांनी दिली. हिरामण नामदेव पवार (४०, रा. मळगाव, ता. सटाणा, सध्या रा. कंधाणे फाटा, मोरेनगर शिवार) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

संशयिताचे घर घटनास्थळावरून 15 फूट अंतरावर- ३ एप्रिल रोजी सटाणा येथील कंधाणे फाटा, मोरेनगर शिवारातील हॉटेल गुरूकृपाचे पाठीमागे मोकळ्या जागेत घमजी रंगनाथ माळी(४५, सध्या रा. मोरेनगर शिवार, मुळ रा. पिंगळवाडे, ता. सटाणा) यांचा मृतदेह सापडला ( Satana Murder case ) हाेता. सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार ( PI Subhash Anmulwar ) व स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळाची पाहणी करून घमजी माळी यांच्या दैनंदिन कामकाज व राहण्याची माहिती घेतली. तपासात संशयित हिरामण पवार याचे घर हे घटनास्थळापासून १५ फूट अंतरावर असल्याचे आढळले. संशयित आरोपी व त्याचे कुटुंब उडवाउडवीचे उत्तर देत होते. त्यांच्या हालचालीदेखील संशयास्पद वाटल्याने त्यांना ताब्यात घेतले.

सटाण्यातील खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश

दगड डोक्यात घालून केले ठार - सखोल चौकशी केली असता २ एप्रिलला रात्री १० ते ११ वाजता घमजी माळी हे हिरामण पवार यांच्या घरी गेले होते. राग अनावर झाल्याने पवार याने माळी यांच्या डोक्यात बाटली टाकून खाली पाडले. त्यानंतर दगड डोक्यात घालून ठार केले. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या सुचनेनुसार पाेलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक किरण पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर उपनिरीक्षक राहुल गवई, पोलीस कर्मचारी जिभाऊ पवार, अजय महाजन, अतुल आहेर, विजय वाघ, ज्ञानेश्वर शिरोळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

हेही वाचा-धक्कादायक CCTV VIDEO! अवघ्या 12 हजारांसाठी वडिलांनी मुलाला पेट्रोल टाकून जाळले

हेही वाचा-Women Murder Case Bhadravati : खुनापूर्वी 'त्या' तरुणीवर अत्याचार नाही, शवविच्छेदन अहवालामधून स्पष्ट; ओळखीचे गूढ मात्र कायम

हेही वाचा-अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रेयसीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी, एकाची गळा चरून हत्या केल्याचे उघड

Last Updated : Apr 8, 2022, 4:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.