नाशिक - नाशिकच्या पाथर्डी फाटा परीसरात गळफास घेत महिलेने आत्महत्या केली असून पोलिसांना साडेतीन वर्षीय मुलाचा देखील मृत्यूदेह घरात आढळून आला आहे. मुलाचा खून करून महिलेने आत्महत्या केली असावी अशी अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या बाबत इंदिरानगर भागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिखा सागर पाठक वय (32 रा साई सिद्धी अपार्टमेंट पाथर्डी फाटा) त्यांच्या राहत्या घरात आई-वडील हॉलमध्ये बसलेले असताना बेडरूमचा दरवाजा बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मुलगा रिधानचा उशीने गळा दाबून खून केला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर ,पोलीस उपआयुक्त विजय खरात, सहायक आयुक्त सोहेल शेख घटनास्थळी त्वरित दाखल झाले. मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आली आहे.मात्र, या बाबत अद्याप पोलिसांनी कुठलीच माहिती सांगितलं नाही. शिखाचे कुटुंब सदन असून पती इंजिनिअर आहे,मात्र गेल्या काही दिवसापासून शिखा मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचं समजतंय. शिखाने एवढे मोठे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत चर्चला उधाण आलं आहे.
सहा दिवसापूर्वी अशी घडली घटना
दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी गावात संगिता प्रकाश पवार (वय 25 रा. मंगरूळ ता. चांदवड) ही आपला मुलगा कार्तिक प्रकाश पवार (वय 7) याच्यासोबत भाड्याच्या खोलीत राहत होती. तिच्यासोबत एक व्यक्ती देखील राहत होती. ही व्यक्ती नेहमी दारू पिऊन मारहाण व शिवीगाळ करीत असल्याने त्याच्या नेहमीच्या जाचाला कंटाळून संगीता पवार हिने गुरुवारी 4 ऑगस्ट रोजी आपला मुलगा कार्तिक याला गळफास दिला व स्वतःसुध्दा आत्महत्या केली.
नाशिकमध्ये चिमुकल्यासह आईने केली आत्महत्या - nashik crime
शिखा सागर पाठक वय (32 रा साई सिद्धी अपार्टमेंट पाथर्डी फाटा) त्यांच्या राहत्या घरात आई-वडील हॉलमध्ये बसलेले असताना बेडरूमचा दरवाजा बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली.