नाशिक - राहुल गांधी यांनी म्हटले होती की, देशात हिंदूंचे सरकार आणायचे आहे. मग आता काय आफ्रिकन लोक राज्य करत आहेत का? असा टोला राज ठाकरेंनी राहुल गांधी यांना लगावला. राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - Raj Thackeray In Nashik : भाजपा-मनसे युतीची चर्चेवर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे म्हणाले, मी आता राहुल गांधींचे स्टेटमेंट वाचले. मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही. या देशामध्ये हिंदूंचे राज्य आले पाहिजे. मग, आता काय आफ्रिकन लोक राहतात का येथे. कोण करत आहेत राज्य? असा टोला आपल्या शैलीत राज ठाकरे यांनी राहुल गांधींना लगावला.
राहुल गांधी यांनी काय म्हटले होते
आम्हाला घाबरवले जाऊ शकत नाही. आम्ही मृत्यूला भीत नाही. हिंदुत्ववाद्यांना फक्त सत्ता हवी आहे, सत्य नाही. त्यांचा मार्ग सत्याग्रह नसून 'सत्ता'ग्रह आहे. हिंदू आपल्या भीतीचा सामना करतो, तो शिव शंकराप्रमाणे आपली भीती प्राशन करून टाकतो. मात्र, हिंदुत्ववादी भीतीत जगत असतात, असे राहुल गांधींनी म्हटले होते.
60 वर्षे शरद चंद्र दर्शन करतो
शरद पवार यांना 81 वर्ष पूर्ण होत आहेत. हे चांगले आहे. हा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आहे. देश गेली 60 वर्षे शरदचंद्र दर्शन करतो आहे. महाराष्ट्रात ते या वयात ज्या प्रकारे फिरत आहेत ते घेण्यासारखे आहे. राजकीय मतभेद असतात, मात्र चांगल्याला चांगल म्हटले पाहिले, ही संस्कृती आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा - Schools Start : ढोल-ताशा वाजत शाळा झाली सुरू, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावण