नाशिक - नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यातील काही गावात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. यामुळे काही ठिकाणी जमिनीला तडे गेले आहेत. ( Nashik earthquake ) यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील नाचलोंडी धानपाडा खरपाडी तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणपाडा, खेरपल्ली या गावात गुरुवारी रात्री उशिरा भूकंपाचे संवेदके जाणवल्याची नोंद मिरीच्या भूमापन यंत्रात झाली आहे. ( Nashik earthquake ) मात्र, धक्के हे सौम्य असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहावं, असा आवाहन जिल्हा प्रशासनांनी केला आहे.
सौम्य धक्के - 21 जुलैच्या रात्री 12 वाजून 2 मिनिटांनी मेरीपासून 40 किलोमीटर अंतरावर 2.4 रिश्टल स्केल, तर रात्री 12 वाजून 30 मिनिटांनी 3 रिश्टल स्केल क्षमतेचे 2 धक्के जाणवल्याची नोंद मेरीच्या भूकंप मापक केंद्रावर झाली आहे. यावेळी जमिनीत मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं होते. ( Nashik earthquake )
जमिनीला तडे - त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गंगाद्वार परिसरातील मेटघेरा हद्दीतील जांबाचीवाडी येथे जमिनीला मोठ- मोठ्या भेगा पडल्या असून, परिसरात 30 ते 40 खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भूगर्भ तज्ञांनी हे तडे कशामुळे पडले आहे, याची पाहणी करून त्वरित खुलासा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
भूकंप केव्हा होतात : वास्तविक, पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स असतात ज्या सतत फिरत असतात. ज्या ठिकाणी या प्लेट्स अधिक आदळतात त्यांना फॉल्ट लाइन झोन म्हणतात. वारंवार टक्कर झाल्यामुळे, प्लेट्सचे कोपरे वळवले जातात. जेव्हा दबाव वाढू लागतो जेणेकरून प्लेट्स तुटू लागतात. त्यांच्या बिघाडामुळे आतील ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधते. या गडबडीनंतर भूकंप होतो.
हेही वाचा - धनुष्यबाण चिन्हासाठी एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे निवडणूक आयोगासमोर आमनेसामने