ETV Bharat / city

कोरोनाचा एकजुटीने सामना करू.. नाशिक वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण करण्याचा मानस - छगन भुजबळ - नाशिक झेंडावंदन

नाशिकचे उत्तम हवामान व सुसंस्कृत राहणीमान ही ओळख टिकवून नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण करण्याचा मानस आहे. तसेच आज सर्वांनी जात, धर्म, प्रांत, लिंगभेद विसरुन कोरोनासारख्या विषाणूचा एकजुटीच्या भावनेने सामना करण्याचे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी केले आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
author img

By

Published : Aug 15, 2021, 5:37 PM IST

Updated : Aug 15, 2021, 6:27 PM IST

नाशिक - नाशिकचे उत्तम हवामान व सुसंस्कृत राहणीमान ही ओळख टिकवून नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण करण्याचा मानस आहे. तसेच आज सर्वांनी जात, धर्म, प्रांत, लिंगभेद विसरुन कोरोनासारख्या विषाणूचा एकजुटीच्या भावनेने सामना करण्याचे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी केले आहे.

स्वातंत्र्यदिनी सर्वांच्या एकजूट व ऐक्यातून कोरोनामुक्ती संकल्प -

नाशिक रोडच्या विभागीय आयुक्त कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहन छगन भुजबळ यांचे हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. क्रांतीकारक, स्वातंत्रसैनिकांनी जसे देशाला ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त करुन स्वातंत्र्य मिळवून देण्याचा चंग बांधला होता. त्याप्रमाणे आज स्वातंत्र्यदिनी सर्वांनी एकजूट व ऐक्यातून देशाला, राज्याला व जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी सर्व नागरिकांना केले आहे. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पदव्यूत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था देशात रोल मॉडेल ठरेल अशा पध्दतीने विकसित करण्यात येणार असल्याचेही यावेळी भुजबळ यांनी सांगितले आहे..

नाशिकमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
राज्यात 1 हजार 167 शिवभोजन केंद्रामार्फत 5 कोटी थाळी वाटप -
सर्व यंत्रणेच्या अहोरात्र मेहनतीने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. कोरोना काळात आपली आरोग्य व्यवस्था बळकटीकरणावर भर देवून नवीन ऑपरेशन थिएटर्स, ऑक्सिजन प्लांट, सर्वसुविधांनी युक्त प्रयोगशाळा कमी कालावधीत पूर्ण करण्यात येत आहे. तसेच म्युकरमायकोसिस सारख्या आजाराला प्रशासन व आरोग्य विभागाने प्रभावीपणे नियंत्रणात आणले असल्याचे सांगत भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले. कोरानासारख्या संकटकाळात कुणाचीही उपासमार होवू नये यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यात 1 हजार 167 शिवभोजन केंद्रामार्फत 5 कोटी थाळी वाटपाचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर 15 एप्रिल 2021 पासून गरीब व गरजू जनतेला शिवभोजन थाळी नि:शुल्क उपलब्ध करुन दिली जात असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
स्वातंत्र्यदिनी ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प राज्यभर सुरू -
आज स्वातंत्र्यदिनी ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प राज्यभर सुरू करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन पीक कर्ज, पीक विमा अशा योजनांचा लाभासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल ॲपच्या आधारे स्वत: पीक पेरणीची माहिती तलाठ्याकडे पाठविता येणार आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबारा व खाते उतारा थेट वेब पोर्टलवरून ऑनलाईन उपलब्ध करून देण्याची सुविधा महसूल प्रशासनाने विकसित केली आहे. तसेच ई-फेरफार प्रणालीमध्ये अनोंदणीकृत व नोंदणीकृत फेरफार यांची प्रलंबित संख्या कमी करण्याच्या कामात नाशिक महसूल विभाग आघाडीवर असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
कोरोना काळात पालक गमावलेल्या 24 बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे सहाय्य मंजूर -
नाशिक विभागातील आत्महत्याग्रस्त पात्र शेतकरी कुटुंबियांच्या वारसांना सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून उभारी योजनेच्या माध्यमातून मदत करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षामार्फत 1 हजार 341 अर्जांचे निराकरण करण्यात आले आहे. डिजिटल इंडिया आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात अभिलेखांच्या स्कॅनिंग प्रकल्पाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे. कोरोना काळात कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 24 बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपये सहाय्य मंजुर करण्यात आले आहे. संगोपन योजनेंतर्गत एकूण 531 बालकांना दरमहा अकराशे रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याद्वारे 100 सेवा देणारा नाशिक हा राज्यातील एकमेव जिल्हा असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे.
पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण -
देशातील सीमारेषेवर लष्करी कार्यवाही करताना सन-2019 मध्ये बालाकोट हवाई हल्ला चालू असताना बडगाव जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना 27 फेब्रुवारी 2019 रोजी हेलिकॉप्टर क्रॅश झालेमुळे स्क्वाड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे ( रा.नाशिक) हे शहीद झाले आहेत. त्यांच्या वीर पत्नी, वीर माता व पिता यांना महाराष्ट्र शासनातर्फे एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देणेत आली असून, त्यांचा पालकमंत्री भुजबळ यांचे हस्ते ताम्रपट देऊन सन्मान करण्यात आला आहे.3 मार्च 2018 रोजी नायक निलेश अहिरे यांना ऑपरेशन रक्षक दरम्यान जम्मू व काश्मिर येथे कर्तव्यावर असतांना जेव्हा त्यांची सैन्य तुकडी पेट्रोलिंग करत होती आणि त्यावेळी भूसुरुंगाचा स्फोट झाल्याने त्यांना अपंगत्व आले असून सबब महाराष्ट्र शासनातर्फे साडे आठ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली असून पालकमंत्री भुजबळ यांचे हस्ते ताम्रपट देऊन सन्मान करण्यात आला आहे.26 मार्च 2018 रोजी सकाळी 10:15 वाजता शिपाई भोकरे रावसाहेब धुडकु यांना ऑपरेशन रक्षक दरम्यान जम्मू व काश्मिर येथे कर्तव्यावर असताना अपंगत्व आले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली असून पालकमंत्री भुजबळ यांचे हस्ते ताम्रपट देऊन सन्मान करण्यात आला आहे.

Last Updated : Aug 15, 2021, 6:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.