ETV Bharat / city

नाशिक - झिरवाळ यांनी पारंपारिक पध्दतीने साजरी केली दिवाळी - झिरवळांची आदिवासींसोबत दिवाळी

झिरवाळ हे मुळातच सुरुवातीपासूनच एक कलाकार म्हणून सर्वांना परिचित आहे. त्यांनी आदिवासी पाड्यात जाऊन आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली.

Zirwal celebrated diwali
Zirwal celebrated diwali
author img

By

Published : Nov 7, 2021, 5:25 PM IST

नाशिक - मंत्री,आमदार व खासदार यांची दिवाळी म्हणजे लाखोंची उधळपट्टी असा अनेकांचा समज असतो. पण या प्रतिमेस तडा देत राज्याच्या विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष तथा आमदार नरहरी झिरवाळ यांनी साजरी केलेली आदिवासी संस्कृतील दिवाळी सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

झिरवाळ यांनी पारंपारिक पध्दतीने साजरी केली दिवाळी
आमदार विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष म्हणून नावलौकिक असतानादेखील दिंडोरीचे आमदार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांनी आदिवासींच्या पारंपरिक पद्धतीने आपल्या घरातील परिवारातील आणि आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांसह दिवाळी साजरी केली.

पारंपारिक आदिवासी गीत गात साजरी दिवाळी
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांनी आदिवासींच्या पारंपरिक पद्धतीने आपल्या घरातील परिवारातील आणि आजूबाजूला राहणाऱ्या नागरिक व चिमुकल्यांसह दिवाळी साजरी केली. झिरवाळ हे मुळातच सुरुवातीपासूनच एक कलाकार म्हणून सर्वांना परिचित आहे. त्यांचा मूळ परिचय हा कलाकार म्हणूनच अनेकांना माहिती नाही. परंतु आदिवासी पाड्यांवर जाऊन परंपरा जोपासण्यासाठी त्या माध्यमातून संदेश देण्याचे कार्य आणि त्यातून काही काळ उदरनिर्वाह करण्याचे कार्य देखील त्यांनी केले आहे. कालांतराने झिरवाळ हे आमदार झाले आणि पुढे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून झाले. घरामध्ये लाल दिवा नोकर-चाकर सगळं असताना देखील आपली परंपरा त्यांनी याही दिवाळीमध्ये पाळून एक अनोखी दिवाळी साजरी केली. त्या घरासमोर लाल दिव्याची गाडी आणि रुबाब असतांना देखील त्याला फाटा देऊन झिरवाळ यांनी घरातील आणि आदिवासी भागातील लहान मुलांना एकत्र करून त्यांच्या बरोबर पारंपारिक आदिवासी गीत गात आपल्या बालपणाची आठवण उजळून दिवाळी साजरी केली. यावेळेस त्यांच्या परिवारातील सदस्य देखील उपस्थित होते. य‍ा अगोदर लाखोंचा खर्चाला फाटा देत त्यांनी त्यांच्या मुलाचे आदिवासी पध्दतीने केलेले लग्न व त्यात पारंपारिक गाण्यावर धरलेल‍ा ठेका लक्षवेधी ठरला होता.

हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : जाणून घ्या, लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.