ETV Bharat / city

नाशिकमधील मुरलीधर मंदिरात जन्माष्टमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

author img

By

Published : Aug 22, 2019, 3:16 PM IST

नाशिकमधील मुरलीधर मंदिरात जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

नाशिकमधील मुरलीधर मंदिर

नाशिक - जिल्ह्यात कापड बाजारातील प्राचीन मुरलीधर मंदिरात जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे याठिकाणी १६ ऑगस्टपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जन्माष्टमी उत्सवाबाबत माहिती देताना मंदिरातील पुजारी

उत्सव काळात कृष्णाला विविध रुपात सजवले जाते. यात श्रीकृष्ण झुल्यावर, अर्धनारी नटेश्वर रुपात, चंद्रावर, गरुडावर, शेषनागावर विराजमान असतात. जन्माष्टमी उत्सव काळात मंदिरात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम देखील होतात. तसेच जन्माष्टमीच्या १ दिवस आधी रात्री भजन, किर्तन होऊन ठीक १२ वाजता कृष्णजन्माच्या वेळी मोठा सोहळा संपन्न होतो.

कार्यक्रमानिमित्त जिल्हाभरातून भाविक येथे येत असतात. या मुरलीधराकडे मागितलेली मनोकामना पूर्ण होते असल्याची भक्तांची श्रद्धा असून वर्षभर या मंदिरात भाविकांची गर्दी असते. एकूण या मुरलीधराच्या मंदिरात जन्माष्टमी उत्सवाची धूम बघायला मिळते.

मंदिराबाबत माहिती

धार्मिक आध्यात्मिक नगरी सोबत मंदिरांचे शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. याच नाशिक मध्ये असलेल्या कापड बाजारातील प्राचीन मुरलीधर मंदिर हे अनेक भाविकांचे श्रद्धा स्थान आहे. या मंदिरात जन्माष्टमी उत्सव जोरात साजरा केला जातो. ८ दिवस सलग येथे धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे येथे असलेल्या अखंड पाषाणातील ३ फुटाची कृष्णाची मूर्ती १८२५ साली गुंडराज महाराजांनी या मंदिराची स्थापना केली. आज त्यांची १५वी पिढी या मंदिराची देखभाल करत आहे.

Intro:नाशिक मध्ये मुरलीधरच्या विविध रूपांनी भाविकांना मोहिनी...

Body:धार्मिक आध्यत्मिक नगरी सोबत मंदिरांचे शहर म्हणून नाशिकची ओळख आहे,ह्याच नाशिक मध्ये असलेल्या कापड बाजारातील प्राचीन मुरलीधर मंदिर हे अनेक भाविकांचे श्रद्धा स्थान आहे ,ह्याच मंदिरात जन्माष्टमी उत्सव जोरात साजरी केली जातो, आठ दिवस सलग इथं धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते,ह्या मंदिराचे विशेष म्हणजे इथं असलेल्या अखंड पाषाणातील 3 फुटाची कृष्णाची मूर्ती,1825 साली गुंडराज महाराजांनी ह्या मंदिराची स्थपना केली,आज त्यांची 15 वी पिढी ह्या मंदिराची देखभाल करत आहे,

ह्या उत्सव काळात कृष्णाला विविध रूप दिले जातं,यात देव झुल्यावर,अर्धनारी नटेश्वर रूप ,चंद्रवर,गरूडवर,शेषनागावर विराज असतात,जन्माष्टमी उत्सव काळात मंदिरात विविध धार्मिक संस्कृतीक कार्यक्रम देखील होत असतात,तसेच जन्माष्टमीच्या आदल्या रात्री भजन,कीर्तन होऊन ठीक वाजता 12 वाजता कृष्णजन्माच्या वेळी मोठा सोहळा संपन्न होतो, ह्या दरम्यान नाशिक जिल्हाभरातून भाविक इथं येत असतात,ह्या मुरलीधराकडे मागितलेली मनोकामना पूर्ण होते असल्याची भक्तांची श्रद्धा असून वर्षभर ह्या मंदिरात भाविकांची गर्दी असते..
एकूण ह्या मुरलीधराच्या मंदिरात जन्माष्टमी उत्सवाची धूम बघायला मिळतेय...
संदेश संत गुरुजी
भाविकांना मोहिनी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.