नाशिक - बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सीवर सरसकट बंदी न घालता या चलनावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा भारत सरकारने उभारावी, असे मत अर्थतज्ञ दीपाली चांडक यांनी व्यक्त केले आहे.
भारतात बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याची शिफारस एका सरकारी पॅनलने केली आहे. परंतु, या विषयावर अर्थतज्ञांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. बिटकॉइन हे आर्थिक इंजिनिअरींगचा भाग असून, अशा प्रकारची विदेशी प्रणाली स्वीकारण्यासाठी भारत सरकारने वेळ घ्यावा. तसेच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने देशात बँकिंगसाठी आरबीआय, पेन्शन,पीएफआरडी आणि शेअरसाठी सेबी आहे, त्याचप्रमाणे क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहार नियंत्रणासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे दीपाली चांडक यांनी सांगितले.
तसेच सरकारने क्रिप्टोकरन्सी संबंधी सक्षम यंत्रणा उभारल्यास बिटकॉइनच्या नावाने घडणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांनाही आळा बसू शकेल,असं तज्ञांच मत आहे.