नाशिक - लॉकडाऊन काळात बहुतेक जणांनी मोबाइलचा मोठ्या प्रमाणत वापर केला. या काळात अनेक जण प्रेम प्रकरणात अडकली. ओळखी व्यक्तींशी संबंध आले, अशात लॉकडाऊन सेक्सटिंगच्या प्रमाणात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशात अनेक घटनांमध्ये समोरच्या व्यक्ती कडून झालेल्या विश्वासघातामुळे काही जणांच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याने त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावा लागत आहे. आपला मुलगा मोबाईलचा वापर कसा करतो, याकडे पालकांकडून लक्ष देण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली असल्याचे मत मानसोपचार तज्ञ डॉ. हेमंत सोननीस ( Dr Hemant Sonnis ) यांनी व्यक्त केले आहे.
सेक्सटिंग म्हणजे काय ? सेक्सटिंग म्हणजे मुलामुलीची प्रत्यक्षात भेट न होता मोबाइलच्या माध्यमातून एकमेकांसोबत अश्लील संभाषण करणे, लैंगिक विषय विषय मॅसेज एकमेकांना पाठवणे, स्वतःच्या नग्न फोटोची देवाणघेवाण करणे, यातून उत्तेजना मिळते. अशात किशोरवयीन तसेच अनोळखी तरुण-तरुणी आणि काही प्रमाणात प्रौढ विवाहितांना देखील हे व्यसन जडल्याने गंभीर परिणाम होण्याच्या धोका वाढला आहे. अशात दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर काही प्रकरणात समोरील व्यक्तीच्या नग्न फोटोचा आधार घेत ब्लॅकमेल सारखे प्रकार देखील घडत आहे.
डॉक्टरकडे आलेली केस नं 1 : मिलन वय 20 वर्ष (नाव बदलले) - लॉकडाऊन काळात इन्स्टाग्रामवरच्या माध्यमातून नाशिक शहराबाहेरील एक मुलाशी ओळख झाली. काही दिवस प्रेमाच्या गप्पा मारल्यानंतर त्याच्यात सेक्सटिंगचे प्रकार सुरू झाले. ते एकमेकांना अश्लील मॅसेज करत, यानंतर कालांतराने एकमेकांना स्वतःचे नग्न फोटो, व्हिडिओ कॉलकरून तात्पुरती लैंगिक संतुष्टी मिळत होते. या गोष्टीचे त्यांना व्यसन लागले होते. कालांतराने त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. युवतीने मुलाशी बोलणे बंद केल्यानंतर त्यांनी तिला धमकी देत तुझे नग्न फोटो सार्वजनिक करून तुझी बदनामी करेल असं म्हणत तिच्या सोबत शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. अशात ही युवती मानसिक दडपणाखाली गेली असून तिच्यावर उपचार सुरू आहे.
डॉक्टरकडे आलेली केस नं 2 : रीमा वय 22 वर्ष..(नाव बदलेले) - या युवतीचे एकाच वेळी तीन मुलांसोबत अफेअर सुरू होत, ही युवती तिघांसोबत सेक्सटिंग करत होती. अशात तिसऱ्या मुलाबरोबर तिला प्रेम झाले, आधी केलेल्या चुका दुरुस्त करून आपण या मुलासोबत लग्न करू असे तिला वाटले होते, त्यामुळे तिने आधीच्या दोघांशी बोलणे बंद केले, याचा राग येऊन आधीच्या एक मुलाने तिचे नग्न फोटो आणि अश्लील चॅटचे स्कीनशॉट तिच्या प्रियकराला पाठवले आणि त्यामुळे तिचा प्रेमभंग झाला. आणि ती मानसिक दडपणाखाली गेली असून तिच्यावर उपचार सुरू असून हळूहळू ती बरी होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मानसोपचार तज्ञांकडे आलेल्या केसेस - 15 ते 20 वयोगटातील 45 ते 50 टक्के, 20 ते 30 वयोगटातील 30 ते 40 टक्के, 40 ते 75 वयोगटातील 10 ते 20 टक्के इतके प्रमाण आहे. महिन्यात सर्वसाधारण 15 ते 20 नवीन केसेस येत असल्याचं डॉ हेमंत सोननीस यांनी सांगितले
पालकांनी लक्ष द्यावे - सेक्सटिंग या प्रकारात प्रत्यक्ष भेट न होता. अश्लील चॅटिंग, एकमेकांना अर्धनग्न, नग्न पाठवल्याने उत्तेजना मिळत असल्याने हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अशात चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात येण्याची शक्यता असते. त्यात ब्लॅकमेलिंगचा धोका संभवतो. विवाहित व्यक्तींच्या कुटुंबावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आपला मुलगा-मुलगी मोबाईलचा वापर कसा करते यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून अशा प्रकारापासून ते वाचू शकतात, असा मानसोपचार तज्ञांनी सल्ला दिला आहे.
हेही वाचा - Complaint Filed Against CM : औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री शिंदेंविरोधात पोलिसांत तक्रार; 'हे' आहे कारण