ETV Bharat / city

Electric Vehicle Nashik : नाशकात वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरामुळे इलेक्ट्रिक वाहनांची विक्रीत वाढ

author img

By

Published : May 6, 2022, 7:13 PM IST

Updated : May 6, 2022, 7:21 PM IST

अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त ( Moment of Akshayya Tritiya ) साधत नाशिक शहरात ग्राहकांनी 600 हुन अधिक इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी ( Purchase of more than 600 electric vehicles Nashik ) केली आहे. मागील तीन वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक विक्री पटीने वाढ झाल्याचे इलेक्ट्रिक वाहन विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे वाहनधारकांनीही आता इलेक्ट्रिक वाहनांना ( Electric vehicle Nashik ) पसंती द्यायला सुरुवात केली आहे.

Electric Vehicle Nashik
Electric Vehicle Nashik

नाशिक - सातत्याने वाढत्या इंधन दर वाढीमुळे आता नागरिक इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला पसंती देऊ लागले आहेत. त्यामुळे विद्युत वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त ( Moment of Akshayya Tritiya ) साधत नाशिक शहरात ग्राहकांनी 600 हुन अधिक इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी ( Purchase of more than 600 electric vehicles Nashik ) केली आहे. मागील तीन वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक विक्री पटीने वाढ झाल्याचे इलेक्ट्रिक वाहन विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे वाहनधारकांनीही आता इलेक्ट्रिक वाहनांना ( Electric vehicle Nashik ) पसंती द्यायला सुरुवात केली आहे.

इलेक्ट्रिक वाहनांची विक्रीत वाढ नाशिक

नाशिक शहरात पेट्रोलचे दर 120 रुपये लिटर, तर डिझेलचे दर 103 रुपये लिटरपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. अशाच वाहनधारकांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. पारंपारिक इंधनाचा तुटवडा व प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नागरिक पेट्रोल डिझेलला स्वस्त पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नाशिक शहरात सुमारे 500 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली. तर 125 हुन अधिक तीन चाकी इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. त्यापाठोपाठ चार चाकी वाहनांमध्ये नवीन प्रकारच्या वाहनांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.

'चांगली बचत होते' : इलेक्ट्रिक बाइक एकदा तीन ते चार तास चार्ज केले की ते वाहन साधारणपणे 90 ते 100 किलो मीटर पर्यंत चालते. त्यामुळे चांगली बचत होऊ शकते. तसेच पर्यावरणाला देखील हातभार लागतो. इलेक्ट्रिक बाइक या पेट्रोल बाइक पेक्षा अधिक परवडतात. शिवाय इलेक्ट्रिक वाहन आधुनिक तंत्रज्ञान आहे, ते प्रत्येकाने आत्मसात करायला हवे, असे इलेक्ट्रिक वाहनधारक सांगतात.

इलेक्ट्रिक बाइकची मागणी वाढली : पेट्रोल डिझेलचे भाव सातत्याने वाढत असल्याने अनेकांना आता वाहन चालवणे परवडत नाही. त्यामुळे नागरिक आता इलेक्ट्रिक बाईक खरेदी करत आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आम्ही 25 इलेक्ट्रिक बाइकची विक्री केली. इतर दिवशी देखील 2 ते 3 बाईकची विक्री होत आहे. 2 ते 3 युनिट बॅटरी चार्जमध्ये वाहन 100 ते 120 किलोमीटर पर्यंत चालते म्हणजे 20 ते 25 पैसे प्रति किलोमीटर खर्च येतो. इलेक्ट्रिक बाइक वाहनधारकांना चांगला पर्याय आहे.

हेही वाचा - Ajit Pawar Criticized Raj Thackeray : 'राज ठाकरेंनी जी-जी आंदोलने केली, ती राज्याच्या नुकसानीची', अजित पवारांचा टोला

Last Updated : May 6, 2022, 7:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.