नाशिक - जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नाशिक बाजार समितीमध्ये आवक घेटल्याने किरकोळ बाजारात भाजीपाल्यांची दरात मोठी वाढ झाली आहे. राज्यासह नाशिक जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू असल्याने भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. त्यामुळे नाशिक बाजार समितीमध्ये आवक घटल्याने किरकोळ बाजारात भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे. नाशिक बाजार समितीत सिन्नर, नाशिक, त्रंबकेश्वर, दिंडोरी, निफाड, इगतपुरी, पेठ या तालुक्यातून भाजीपाला विक्रीसाठी येतो. परंतू, पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले, असल्याने 50 टक्के आवक घटली आहे. परिणामी किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले.
अवाक घटल्याचा परिमाण.. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मुंबई उपनगरात दररोज 30 ते 35 ट्रक भाजीपाला पाठवला जातो. परंतू सध्या आवक घटल्याने व्यापाऱ्यांना 12 ते 15 ट्रक भाजीपाला पाठवावा लागत आहे. तर, गुजरात राज्यात देखील नाशिकमधून दररोज 10 ते 12 ट्रक भाजीपाला पाठवला जातो. मात्र त्यातही घट झाली असून, केवळ चार ते सहा ट्रक भाजीपाला पाठवला जात असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे.
वातावरण चांगले झाल्यावर दर स्थिर होतील.. सध्या नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भाजीपाला खराब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाले आहे. आता वातावरण चांगले झाल्यानंतरच आवक वाढेल, त्यानंतर दर स्थिर होतील असे राजू पाटील या शेतकऱ्यांना सांगितले..
किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे दर..
वांगे 80 रुपये किलो,
गवार 130 ते 140,
वटाणा 150 ते 160 किलो,
भेंडी 80 ते 100 किलो,
कारले 80 ते 100 किलो,
मेथी 50 ते 60 रुपये जुडी,
वाल 110 ते 120 किलो,
टोमॅटो 30 ते 40 रुपये किलो,
बटाटा 30 रुपये किलो,
पालक 40 ते 50 जुडी,
कोथिंबीर 90 ते 100 जुडी,
काकडी 50 ते 60 किलो,
चवळी 110 ते 120 किलो,
घेवडा 130 ते 140 रुपये किलो.
सोयाबीनचे मोठे नुकसान.. नाशिक जिल्ह्यात पावसामुळे भाजीपाल्या सोबतच मका, सोयाबीन या खरीप पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार जवळपास 450 हेक्टर वरील सोयाबीनचे नुकसान झालं असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. त्या खालोखाल 380 हेक्टर वरील मका पिकाचे देखील नुकसान झाले आहे. पेठ, त्रंबकेश्वर , सुरगाणा, इगतपुरी तालुक्यात भात पिकालाही मोठा फटका बसला आहे. शेतात पाणी शिरून जवळपास 80 हेक्टर वरील भात पिकाचे नुकसान झाले, तर दिंडोरी, निफाड, पेठ, सुरगाणा, नाशिक तालुक्यात देखील भाजीपाल्याचे मोठं नुकसान झाले. जिल्ह्यात जवळपास दोन हजार हेक्टर वरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.
हेही वाचा - Pravin Darekar : 'उद्धव ठाकरेंना सत्तेची लालसा, चटक ठेवली नसती तर...'; प्रवीण दरेकरांनी साधला निशाणा