ETV Bharat / city

Love affair : अनैतिक प्रेमसंबंधाला अडसर ठरणाऱ्या डाॅक्टर पतीला दिले भुलीचे इंजेक्शन, ३३ दिवस कोमात राहिल्यानंतर मृत्यू - In immoral love affair

प्रेमसंबंधाला अडसर ( Obstacles to love affair ) ठरणाऱ्या डाॅक्टर पतीला धडा शिकवण्यासाठी त्याच्या दुसऱ्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने हाॅस्पिटलमध्येच डाॅक्टरला भुलीचे इंजेक्शन ( anesthesia ) देऊन ठार करण्याचा प्रयत्न केला हाेता.

immoral love affair
अनैतिक प्रेमसंबंधाला अडसर
author img

By

Published : Oct 14, 2022, 6:47 AM IST

नाशिक : प्रेमसंबंधाला अडसर ( Obstacles to love affair ) ठरणाऱ्या डाॅक्टर पतीला धडा शिकवण्यासाठी त्याच्या दुसऱ्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने हाॅस्पिटलमध्येच डाॅक्टरला भुलीचे इंजेक्शन देऊन ठार करण्याचा प्रयत्न केला हाेता. 33 दिवसांपासून काेमात असलेल्या या डाॅक्टरचा अखेर गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला ( Death occurred during treatment ) आहे. याबाबत मुलगा परिक्षित याने फिर्याद दिली हाेती.

प्रियकराच्या मदतीने केला गुन्हा : नाेंदणी विवाह केलेल्या दुसऱ्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने हा गुन्हा केला हाेता. सतिष केशवराव देशमुख असे घटनेतील मृत डाॅक्टरचे नाव आहे. तर, सुहासिनी देशमुख आणि अरुण कांडेकर अशी संशयितांची नावे आहेत. सध्या दाेघेही फरार आहेत. ही धक्कादायक घटना 10 सप्टेंबर राेजी म्हसरुळ येथील परिक्षित हाॅस्पिटलमध्ये घडली हाेती. या प्रकरणी डॉक्टर देशमुख यांचा मुलगा परिक्षित याने फिर्याद दिली हाेती. त्यानुसार म्हसरुळ पाेलिसांत दाेघांविरुद्ध डाॅक्टरला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. म्हसरुळला परिक्षित हाॅस्पिटल असून ते देशमुख यांचे खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयात डाॅ. देशमुख यांची संशयित पत्नी सुहासिनी व तिचा प्रियकर अरुण कांडेकर हे 10 सप्टेंबर रोजी रुग्णालयात असताना डाॅ. देशमुख यांनी दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे बाेलून विचारणा केली. त्यानंतर तिघांत वाद झाले. यानंतर प्रियकर निघून गेला, तर दुसरी पत्नी सुहासिनी डॉक्टर पतीसमवेत रुग्णालयातील विश्रांती कक्षात गेली. तिथे डॉक्टरांना तिने भुलीचे इंजेक्शन देत ठार करण्याचा प्रयत्न केला. ही बाब डॉक्टरांनी मुलगा परिक्षितला सांगितल्यावर त्याने पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, याबाबत वरिष्ठांशी चर्चा करुन दाखल गुन्ह्यात वाढीव कलमांन्वये तपास केला जाईल, अशी माहिती तपासाधिकारी तथा सहायक निरीक्षक आहिरे यांनी दिली.

असा घडला प्रकार : डाॅ. देशमुख यांचे सुहासिनीसाेबत असलेल्या अनैतिक संबंधांमुळे त्यांच्या पहिल्या पत्नीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली. या आत्महत्येेस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात डॉ. देशमुख पाच-सहा वर्षे कारागृहात शिक्षा भाेगत हाेते. देशमुख यांची दुसरी पत्नी सुहासिनी हिला एक अपत्य आहे. मात्र, देशमुख कारागृहात असल्याने तिने दुसऱ्याशी लग्न केले. ज्याच्याशी विवाह केला, त्याचाही काही वर्षांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनापूर्वी डॉ. देशमुख हे कारागृहातून बाहेर आल्यावर पहिल्या पत्नीपासून असलेल्या मुलासह राहू लागले. यानंतर सध्याच्या संशयित पत्नीला कोरोना झाल्याने तिने डॉक्टरांच्या रुग्णालयात उपचार घेतले. तेव्हा दोघे पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी रजिस्टर लग्न केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.