ETV Bharat / city

'मी लस घेतली नाही, घेणारही नाही" इंदोरीकर महाराजांच्या विधानावरून वादंग

author img

By

Published : Nov 3, 2021, 2:12 PM IST

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर एका नव्या विधानामुळे आता पुन्हा वादात सापडले आहे. लसचा काय उपयोग? मी लस घेतली नाही आणि घेणार नाही असे विधान इंदोरीकर महाराजांनी इगतपुरी येथे आयोजित कीर्तनात केले आहे.

'मी लस घेतली नाही, घेणारही नाही" इंदोरीकर महाराजांच्या विधानावरून वादंग
'मी लस घेतली नाही, घेणारही नाही" इंदोरीकर महाराजांच्या विधानावरून वादंग

नाशिक : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर एका नव्या विधानामुळे आता पुन्हा वादात सापडले आहे. लसचा काय उपयोग? मी लस घेतली नाही आणि घेणार नाही असे विधान इंदोरीकर महाराजांनी इगतपुरी येथे आयोजित कीर्तनात केले आहे. त्यांच्या या विधानावरून आता नवीन वादंग सुरू झाले आहे.

इंदोरीकर महाराजांनी महिन्यांपूर्वी पुत्र प्राप्तीवरुन केलेल्या वक्तव्यामुळे चांगलेच वादंग माजले होते. आता कोरोना लसीकरणावरुन केलेल्या विधानामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नाशिकच्या इगतपुरी येथे इंदुरकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात त्यांनी 'कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही आणि घेणारही नाही,' असं म्हटलं आहे.काय म्हणाले महाराज?प्रत्येकाची रोग प्रतिकारक शक्ती वेगवेगळी आहे. प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता वेगवेगळी आहे. कोरोना काळात कोरोना रुग्णाला मानसिक आधार देणे गरजेचे होतं. मात्र घरातील व्यक्तींनी त्यांना दूर ठेवले. प्रभू राम वनवासात गेले तेव्हा 14 वर्षांसाठी सीता माता त्यांच्या सोबत होती. मात्र घरातील रामाला कोरोना झाला तर बायकांनी नवऱ्याला 14 दिवस वनवासात ठेवले. त्यांना वेगळी वागणूक दिली. हे सर्व योग्य नाही. मी तर अजून लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही कोरोना होतच नाही तर घेऊन काय करायचं. कोरोनावर एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा. एकीकडे सरकार देशभरात लसीकरण मोहीम राबवत आहे. कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. मात्र इंदोरीकर महाराजांनी कीर्तनादरम्यान केलेल्या या विधानामुळे आता नवीन वादंग सुरू झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.