ETV Bharat / city

नाशिक :शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून शेकडो शेतकरी दिल्लीकडे रवाना

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचा विरोध करत हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी दिल्लीत मागील २५ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकहून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून शेकडो शेतकरी अनेक वाहनांनी दिल्लीकडे रवाना झाले आहेत

Delhi to support the farmers agitation
महाराष्ट्रातून शेकडो शेतकरी दिल्लीकडे रवाना
author img

By

Published : Dec 21, 2020, 8:04 PM IST

Updated : Dec 21, 2020, 8:15 PM IST

नाशिक - केंद्र सरकार लागू करत असलेले तीन कृषी कायदे रद्द करावे म्हणून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी नाशिकहून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून शेकडो शेतकरी वाहनाने दिल्लीकडे रवाना झाले आहेत. जोपर्यंत सरकार कृषी कायदे रद्द करत नाही, तोपर्यत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

नाशिकहून ओझर, पिंपळगाव, चांदवड, उमराने, मालेगाव आणि शहापूर येथे जनतेच्या वतीने या शेतकरी जथ्याचे स्वागत केलं जाणार आहे. या आंदोलनात शेकडो वाहनांतून शेतकरी 1 हजार 266 किलोमीटरचा प्रवास करून 24 डिसेंबरला दिल्ली बॉर्डरवर पोहचणार आहेत. या आंदोलनात किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, डॉ. डी. एल. कराड, सुनील मालुसरे, राजू दिसले आदी सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्रातून शेकडो शेतकरी दिल्लीकडे रवाना
गोल्फ क्लब मैदानावर सभा -

महाराष्ट्रातून दिल्ली येथे निघालेल्या शेतकऱ्यांच्या लॉग मार्चला विविध शेतकरी संघटनेसोबत आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष, मुस्लीम संघर्ष समिती, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदीने पाठिंबा दिला आहे. लाँग मार्च निघण्यापूर्वी उपस्थित सर्व पक्षाच्या आणि संघटनाच्या प्रमुखांनी मार्गदर्शन केलं.

..तोपर्यंत आंदोलन राहणार सुरूच -

केंद्र सरकार कृषी कायदे रद्द करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी दिला आहे. यासाठी शेतकरी रेशन-पाणी, कपडे सोबत घेऊन दिल्लीला रवाना झाले आहेत.

शेतकरी उध्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा डाव -

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योजकांच्या घशात घालण्याचा डाव घालत आहे. सरकार जर धान्यच खरेदी करणार नाही, तर रेशन व्यवस्था मोडीत निघून गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ येणार आहे. शेतकरी व कामगारांना डावलून कोणी पुढे जाऊ शकत नाही. विजेचे खासगीकरण करून देशाला विकण्याचा डाव केंद्र सरकार करत असल्याचे कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी म्हटलं आहे.

सरकार आंदोलन चिरडू शकत नाही -

दिल्लीत शेतकरी 25 दिवसांपासून आंदोलन करत आहेत आणि त्याला महाराष्ट्रातील शेतकरी पाठिंबा देण्यासाठी जात आहेत. या आंदोलनात आतापर्यंत 30 शेतकरी शहीद झाले आहेत. सरकार जोपर्यंत काळे कायदे पर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. केंद्र सरकारे दिल्ली येथील शेतकऱ्यांचे आंदोलन मोडण्यासाठी साम, दाम, दंडचा उपयोग केला. मात्र आंदोलनकर्ते मागे हटले नाहीत. सरकार एफसीएला संपवण्याचे काम मोदी सरकार करत असल्याचे केरळचे खासदार के. के. रागेश यांनी म्हटलं आहे.

अदानी, अंबानी यांच्या फोटोची होळी -

केंद्र सरकार उद्योगपती असलेले अंबानी आणि अदाणी यांच्या इशाऱ्यावर सरकार चालवत असून त्यांना हिताचे कायदे लागू करत असल्याचे म्हणतं आंदोलनस्थळी या उद्योगपतींचा निषेध करत शेतकऱ्यांनी त्यांचे फोटोंची होळी केली.

Last Updated : Dec 21, 2020, 8:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.