ETV Bharat / city

Human organs found in closed shops: नाशिकात बंद गाळ्यांमध्ये आढळले मानवी अवयव, तपास सुरू - मानवी अवयव बंद गाळे नाशिक

अनेक वर्षांपासून बंद असलेल्या गाळ्यांमध्ये मानवी अवयव ( Human organs found closed shop Nashik ) आणि सांगाडे आढळल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री मुंबई नाका पाेलीस ठाण्याच्याच पाठीमागील साेसायटीत घडली. दरम्यान, हे अवयव वेगवेगळे असून वैद्यकीय शिक्षणासाठी मानवी अवयव संकलन करतात, त्याच पद्धतीने ते संकलित व साठवणूक केल्याचे आढळून आले आहे.

Human organs found shop nashik
मानवी अवयव बंद गाळे नाशिक
author img

By

Published : Mar 28, 2022, 9:14 AM IST

नाशिक - अनेक वर्षांपासून बंद असलेल्या गाळ्यांमध्ये मानवी अवयव ( Human organs found closed shop Nashik ) आणि सांगाडे आढळल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री मुंबई नाका पाेलीस ठाण्याच्याच पाठीमागील साेसायटीत घडली. दरम्यान, हे अवयव वेगवेगळे असून वैद्यकीय शिक्षणासाठी मानवी अवयव संकलन करतात, त्याच पद्धतीने ते संकलित व साठवणूक केल्याचे आढळून आले आहे. मुंबई नाका पाेलिसांनी फाॅरेन्सिक एक्सपर्टच्या मदतीने तपास सुरू केला आहे.

माहिती देताना पोलीस उपायुक्त

हेही वाचा - Aaditya Thackeray Konkan Tour : आदित्य ठाकरे उद्यापासून तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर; तर वरूण सरदेसाईचं राणेंना उत्तर

गाळे पंधरा वर्षांपासून उघडलेलेच नाहीत : मुंबई नाका पोलीस स्टेशनलगत असलेल्या बिल्डिंगच्या बंद पडलेल्या गाळ्यांमध्ये हे अवयव सापडले असून, ते फाॅरेन्सिक लॅब व मृतदेह परीक्षणासाठीच्या प्रयाेगशाळेत ठेवल्या जाणाऱ्या अवस्थेत आढळले आहेत. या गाळ्यांत वेगवेगळ्या बॉटलमध्ये केमिकल परीक्षण व प्रक्रिया करून मानवी डोके, हात, कान व अन्य शारिरीक अवयव सापडले आहेत. तसेच, बादलीमध्ये देखील केमिकल प्रक्रिया करून ठेवलेले मानवी अवशेष सापडले. दरम्यान, गाळे मालकाने दिलेल्या माहितीनुसार, हे गाळे पंधरा वर्षांपासून उघडलेलेच नाहीत. ते बंदच हाेते. याबद्दल मला काहीच माहित नाही, असा दावा त्याने पाेलिसांकडे केला आहे.

गेल्या पंधरा वर्षांपूर्वी मेडिकल कॉलेजचे काही विद्यार्थी या गाळ्यांत राहत होते, असे त्याने सांगितले आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळताच मुंबई नाका पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनिल राेहाेकले, पाेलीस निरीक्षक चंद्रकांत आहिरे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर फॉरेन्सिक टीम दाखल झाली. तपास केला जात आहे.

हेही वाचा - Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचे किरीट सोमैयांना प्रत्युत्तर; म्हणाले, बेकायदेशीर वास्तूंवर कारवाई करण्यासाठी...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.