ETV Bharat / city

ऑक्सिजन गळती प्रकरणाचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती - आरोग्य मंत्री राजेश टोपे - Nashik Divisional Commissioner Radhakrishna

नाशिकमधे घडलेल्या ऑक्सिजन गळती प्रकरणाचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच दुर्घटनेसाठी कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तर मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या वारसांना राज्य शासनाकडून पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल अशी घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

घटनास्थळाची पाहणी करतांना राजेश टोपे
घटनास्थळाची पाहणी करतांना राजेश टोपे
author img

By

Published : Apr 22, 2021, 9:28 AM IST

नाशिक - महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 22 रुग्णांनी प्राण गमावले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी व मनाला वेदना देणारी आहे. याघटनेचा तपास व दोषींवर कारवाई करण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. अशी घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

ऑक्सिजन गळती प्रकरणाचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती
'दुर्घटनेसाठी कारणीभूत असनाऱ्यांवर कठोर कारवाई'

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, "डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयातील घटनेचा तपास व दोषींवर कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली असून, या समितीत एकूण सात सदस्य असणार आहेत. यामध्ये आरोग्य उपसंचालक डॉक्टर पी. डी. गांडाळ, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रमोद गुंजाळ, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त माधुरी पवार, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य ज्ञानदेव नाठे, महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, तसेच ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत संपूर्ण राज्यात स्वयंसेवक म्हणून सेवा देणारे हर्षल पाटील यांचा या समितीमध्ये समावेश आहे". सदर समिती संपूर्ण घटनेचा तपास करणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. घटनेच्या चौकशीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीद्वारे घटनेचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्यात येईल, तसेच दुर्घटनेसाठी कारणीभूत असनाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. अशी माहिती आरोग्य मंत्री टोपे यांनी दिली. तसेच या घटनेची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये, यासाठी या समितीमार्फत एसओपी तयार करण्यात येणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले आहे.

मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या वारसांना राज्य शासनाकडून पाच लाख रुपयांची मदत

नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील घटनेची पाहणी करुन माहिती घेतली असता, तांत्रिक दोषामुळे ही घटना घडली आहे. सिलेंडरमधून लिक्विड ऑक्सिजनची गळती होऊ लागल्याने ही घटना घडली आहे. या गळतीमुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःचे प्राण धोक्यात घालून शर्तीचे प्रयत्न केले. परंतु या दरम्यान रुग्णांना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होऊ न शकल्यामुळे यातील 22 रुग्णांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या वारसांना राज्य शासनाकडून पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

ऑक्सीजन टॅंक गळतीच्या ठिकाणी भेट घेऊन पाहणी केली, तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हाधिकारी सुरज मांढरे उपस्थित होते.

हेही वाचा - पत्नी मदतीसाठी टाहो फोडत राहिली; कोरोना रुग्णाने हॉस्पिटलच्या दारातच सोडले प्राण..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.