ETV Bharat / city

Gudi padwa 2022 : एकमेकांचे काटे न काढता आनंदाची गुढी उभारावी - पालकमंत्री छगन भुजबळ - गुडी पाडवा उत्सव छगन भुजबळ नाशिक

हसावे खेळावे, आनंदाने राहावे ही अपेक्षा आहे. एकमेकांचे काटे न काढता आनंदाच्या गुढ्या उभारा, अशा शुभेच्छा देत पालकमंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal celebrate gudi padwa with Ishwari ) यांनी विरोधकांना चिमटा काढला.

chhagan bhujbal celebrate gudi padwa with Ishwari
गुडी पाडवा उत्सव छगन भुजबळ नाशिक
author img

By

Published : Apr 2, 2022, 12:50 PM IST

Updated : Apr 2, 2022, 1:02 PM IST

नाशिक - गेली अडीच वर्षे अतिशय दुःखदायक गेली. सातत्याने लॉकडाऊन, दुःखद बातम्या यायच्या, पण सर्वकाही हळूहळू पूर्वपदावर येत असून, निर्बंध दूर केले आहे. हसावे खेळावे, आनंदाने राहावे ही अपेक्षा आहे. एकमेकांचे काटे न काढता आनंदाच्या गुढ्या उभारा, अशा शुभेच्छा देत पालकमंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal celebrate gudi padwa with Ishwari ) यांनी विरोधकांना चिमटा काढला.

प्रतिक्रिया देताना पालकमंत्री छगन भुजबळ

हेही वाचा - Gudi Padwa 2022: गुडी पाडव्याचे महत्व काय? गुडी कशी उभारावी? जाणून घ्या...

भुजबळ फार्म या निवासस्थानी भुजबळांची नात ईश्वरी हिच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आज कुठल्याही राजकीय हेतूने बोलत नाही. पुन्हा एकदा पूर्वी सारखे राज्य उभारणीसाठी एकमेकांना मदत केली पाहिजे, असे आवाहन भुजबळ यांनी केले.

ढोल ताशांच्या गजरात भुजबळ फार्मवर नववर्षाचे स्वागत झाले. यावेळी भुजबळ फार्मवर मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. महिला पदाधिकार्‍यांची पारंपरिक वेशभूषा लक्षवेधी ठरली. छगन भुजबळ यांनी यावेळी ढोल वादन करत सण साजरा केला.

हेही वाचा - Nashik Hospital Fire Audit : फायर ऑडिट न केलेल्या 318 रुग्णालयांना नाशिक मनपाची नोटीस

Last Updated : Apr 2, 2022, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.