ETV Bharat / city

Chhagan Bhujbal On Raj Thackeray : टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली हे धादांत खोटं - छगन भुजबळ

author img

By

Published : May 2, 2022, 6:11 PM IST

Updated : May 2, 2022, 6:30 PM IST

शरद पवारांना जातीयवादी ठरवण्यासाठीच काल राज ठाकरेंची सभा होती की काय? असा प्रश्न उपस्थित करत तुम्ही सभेत फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाही, असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंना या केला ( Chhagan Bhujbal On Raj Thackeray ) आहे. नाशिकला एका कार्यक्रमादरम्यान भुजबळ पत्रकारांशी बोलत होते.

Chhagan Bhujbal On Raj Thackeray
छगन भुजबळ

नाशिक - शरद पवारांना जातीयवादी ठरवण्यासाठीच काल राज ठाकरेंची सभा होती की काय? असा प्रश्न उपस्थित करत तुम्ही सभेत फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाही, असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंना या केला ( Chhagan Bhujbal On Raj Thackeray ) आहे. नाशिकला एका कार्यक्रमादरम्यान भुजबळ पत्रकारांशी बोलत होते.

टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली, हे धादांत खोटं - रायगडावर जेव्हा महात्मा फुलेंनी समाधी शोधली, त्यावेळी टिळक केवळ 13 वर्षांचे होते, टिळक दोन वेळा रायगडावर गेले मात्र त्यांना शिवाजी महाराजांची समाधी मिळाली नाही, टिळकांनी एकदा नानासाहेब पेशवे आणि दुसऱ्यांदा रामदास स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. टिळकांनी शिवस्मारकासाठी केवळ फंड गोळा केला. मात्र उभ्या आयुष्यात काहीच केले नाही. पुढे टिळक यांना याबाबत विचारणा झाल्यावर ज्या बँकेत फंड ठेवला होता, ती बँकच बुडाली असे सांगण्यात आल्याचे भुजबळ यांनी म्हटले.

छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

राज ठाकरे चुकीचा इतिहास सांगतात - फुलेंनी पहिली शाळा भिडे यांच्या वाड्यात सुरू केली. ते ब्राम्हण होते, संभाजी भिडे यांनी आयुष्यभर मुस्लिम द्वेष पसरवला, मात्र त्यांची शस्त्रक्रिया रियाज उमर मुजावर या मुस्लिम डॉक्टरने केली, मुजावर यांनी पुरस्कार सोहळ्याला जाण्याऐवजी आपले कर्तव्य केले. शरद पवार यांनी ब्राह्मणांचा द्वेष नाही केला तर ब्राह्मणत्वचा द्वेष केला, असे छगन भुजबळ म्हणाले.

हेही वाचा - Shivaji Maharaj Samadhi Controversy : समाधी बांधण्याबाबत टिळकांचा काहीही संबंध नाही - जितेंद्र आव्हाड

Last Updated : May 2, 2022, 6:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.