ETV Bharat / city

नाशकातून बंगळुरू, हैदराबादसाठी विमानसेवा सुरू; पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नाशकात आजपासून बंगळुरू व हैदराबादसाठी विमानसेवा सुरू झाली आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार असल्याचे वक्तव्य पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

chhagan bhujbal on nashik airport
नाशकातून बंगळुरू, हैदराबादसाठी विमानसेवा सुरू; पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
author img

By

Published : Nov 20, 2020, 7:48 PM IST

नाशिक - शहरात आजपासून बंगळुरू व हैदराबादसाठी विमानसेवा सुरू झाली आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार असल्याचे वक्तव्य पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. देशातील महत्त्वाची शहरे या विमानसेवेमुळे जोडली जाणार असल्याने उद्योग व पर्यटनाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ओझर विमानतळावरून आजपासून सुरू झालेल्या स्पाईस जेट विमानसेवेच्या उदघाटन प्रसंगी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते.

नाशकातून बंगळुरू, हैदराबादसाठी विमानसेवा सुरू; पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
यापुढे दिल्ली, अहमदाबाद तसेच इतरही प्रमुख शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा नाशकातून सुरू होणार आहेत. उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या वाढीसाठी वाहतुकीच्या सोयी सुविधा असणे आवश्यक असते. याअनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील उद्योजक दुसऱ्या राज्यात जाऊन परराज्यातील तसेच परदेशातील उद्योजकांना देखील जिल्ह्यात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देऊ शकतात. यामुळे व्यवसाय वाढून रोजगारनिर्मिती होण्यास मदत होणार आहे,असे भुजबळ म्हणाले.
chhagan bhujbal on nashik airport
नाशकात आजपासून बंगळुरू व हैदराबादसाठी विमानसेवा सुरू झाली आहे.

विमानसेवांमुळे जिल्ह्यातील उद्योग व पर्यटन व्यवसाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले जाऊन ते वाढण्यासाठी चालना मिळणार आहे. मुंबईला जाण्यासाठी चौपदरी रस्ता व उड्डाणपूल असल्याने नाशिकहून मुंबईला काही तासांतच पोहोचता येईल, असे भुजबळ म्हणाले.

नाशिक येथे उद्योग, शिक्षण, पर्यटनासाठी लोकांना विमानसेवेमुळे येणे सहज शक्य होणार आहे. याचसोबत नाशकातील शेती उत्पादनाला देखील देश विदेशपातळीवर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या विमानतळाचा लाभ सर्वांना होणार असल्याने येत्या काही वर्षांतच इतर विमानतळांप्रमाणेच नाशिकहून देशात व परदेशात जाण्यासाठी विमानसेवा सुरू होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. या विमान सेवांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले.

आपल्या जिल्ह्यातून विमानसेवा सुरू होण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. नाशिकमधून सुरू झालेल्या सर्व विमानसेवांचा समावेश उडाण योजनेअंतर्ग करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असे भुजबळ म्हणाले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, प्रांताधिकारी संदीप आहेर, मिग कॉम्प्लेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीएच. वी. शेषगिरी राव, एचएएलचे जनरल मॅनेजर दीपक सिंगल, साकेत चतुर्वेदी आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.