नाशिक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या दोन ते तीन दिवसात नाशिक दौर्यावर येणार आहेत. तेव्हा ते नाशिक शहर आणि जिल्ह्यात लाॅकडाऊन लागू करायचे की नाही, त्याचा निर्णय ते घेतील, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. लाॅकडाऊन करुन कोरोना अटोक्यात येणार नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. परंतू, जर मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबतच्या तज्ज्ञांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला, तर माझे वैयक्तिक मत बाजूला ठेवण्याची तयारी माझी तयारी असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
हेही वाचा - 'निसर्ग'मुळे झालेल्या नुकसान भरपाई वाटपाचे उर्वरित काम वेगाने करा - मुख्यमंत्री
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आज (शुक्रवार) कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिकचा दौरा करणार आहेत. त्यांच्यासोबत तज्ञ अधिकार्यांची समिती देखील येणार आहे.
नाशिकमधील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता एसएमबिटी आणि मविप्रच्या रुग्णालयात अतिरिक्त बेड्सची व्यवस्था केली आहे. शहरात सद्यस्थितीत १२०० बेड्सची व्यवस्था उपलब्ध आहे. शहरातील मृत्यू दर वाढत असला तरी आवाक्यात आहे. लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्याशी बोललो आहे. मुख्यमंत्री आल्यानंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल. पोलीस आयुक्तांच्या बदलीची चर्चा मी ऐकतोय आणि तशी शक्यता नाकारता येत नसल्याचेही भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.